AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रदर्शनाच्या दुसऱ्याच दिवशी ‘सुपर 30’ आॅनलाईन लीक

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची प्रमुख भूमिका असलेला सुपर 30 चित्रपट प्रदर्शित होऊन काही तास उलटत नाहीत, तोच हा चित्रपट इंटरनेटवर लीक झाला आहे.

प्रदर्शनाच्या दुसऱ्याच दिवशी 'सुपर 30' आॅनलाईन लीक
| Updated on: Jul 13, 2019 | 8:18 AM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची प्रमुख भूमिका असलेला सुपर 30 चित्रपट प्रदर्शित होऊन काही तास उलटत नाहीत, तोच हा चित्रपट इंटरनेटवर लीक झाला आहे. पायरसी करणाऱ्या एका साईटने हा चित्रपट लीक केल्याची माहिती ‘फिल्मी बीट’ या वेबसाईटने दिली आहे. हा चित्रपट लीक झाल्याने अनेकजण तो डाऊनलोड  करत आहे.

देशातील विख्यात गणितज्ज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट बनवण्यात आला आहे. काल (12 जुलै) हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला. मात्र हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही तासांच्या आत एका साईटने तो ऑनलाईन लीक केला आहे. त्यामुळे हा संपूर्ण चित्रपट वेबसाईटवर उपलब्ध झाला आहे. यामुळे याचा परिणाम चित्रपटाच्या कमाईवर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या चित्रपटाला सिनेसमीक्षकांनीही चांगले रिव्ह्यू दिले आहेत.

याआधी बॉलिवूडचे अनेक चित्रपट ऑनलाईन लीक झालेत. त्यामुळे या चित्रपटांच्या कमाईत घट झाल्याची समोर आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर पायरसी करणाऱ्या या वेबसाईट तातडीन बंद केल्या जाव्या अशी मागणी चित्रपटसृष्टीने केली होती. मात्र यावर कोणताही तोडगा अद्याप निघालेला नाही. दरम्यान यानंतर आता सुपर 30 चित्रपटालाही पायरसीचे ग्रहण लागले आहे.

हा चित्रपट पाटणाच्या गणितज्ञ आनंद कुमार आणि त्याच्या विद्यार्थ्यांच्या जर्नीवर बनली आहे. आनंद कुमार अशी व्यक्ती आहे, ज्याने गरीब आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आयआयटी परीक्षा उत्तीर्ण करणे शक्य असल्याचे जगाला दाखवून दिले आहे. यात आनंद कुमार यांच्या भूमिकेत हृतिक रोशन दिसणार आहे. त्याच्यासोबतच पंकज त्रिपाठी, मृणाल ठाकूर यांनीही या चित्रपटात स्क्रीन शेअर केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...