मी वैयक्तिकरित्या कंगनाची माफी मागते : आलिया भट्ट

मी वैयक्तिकरित्या कंगनाची माफी मागते : आलिया भट्ट

मुंबई : राणी लक्ष्मीबाई यांच्यावर आधारित मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झाशी या चित्रपटाला बॉलिवूडकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आहे. नेहमीच आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे प्रसिद्ध असणारी अभिनेत्री कंगना राणावतने त्यावरुन सिनेसृष्टीवर निशाणा साधला आहे.  सर्वजण मणिकर्णिका चित्रपटाबाबत इतके गप्प का? असा सवाल कंगनाने बॉलिवूडकरांना विचारला आहे.  कलाकार या सिनेमाला पाठिंबा का देत नाहीत? असा प्रश्न उपस्थित करताना, कंगनाने अभिनेत्री आलिया भट्ट आणि आमीर खानचे नाव घेत त्यांच्यावरही हल्ला चढवला. त्यानंतर आता कंगनाच्या नाराजीवर आलिया भट्टने प्रतिक्रिया दिली आहे.

आलिया म्हणाली, “जर कंगना माझ्यावर नाराज असेल तर मी वैयक्तिकरित्या तिची माफी मागेन. मला वाटत नाही की, कंगना माझ्यावर नाराज असेल. मी तिला जाणूनबजून नाराज केले, असंही नाही. जर मी असे केले असेल तर मी तिची माफी मागेन. मला कंगना नेहमीच आवडते”

आलियाकडून कंगनाचे कौतुक

एक अभिनेत्री आणि व्यक्ती म्हणून कंगना मला खूप आवडते. ती बेधडक आहे, असा रस्ता निवडण्याला हिम्मत लागते. मला तिच्यासोबत झालेल्या त्रासाबद्दल काहीच कल्पना नाही, मी शूटिंगमध्य व्यस्त होते. मला कुणाला नाराज करायचे नाही, असं म्हणत आलियाने कंगनाचं कौतुक केलं.

आमिर खान-आलिया भट्टवर कंगना भडकली

मणिकर्णिका चित्रपटाला पाठिंबा न दिल्यामुळे कंगना राणावत बॉलिवूडवर भडकली होती. माझ्या चित्रपटाच्या प्रीमियरला कुणीही आले नाही. मात्र जेव्हा त्यांची वेळ येते, त्यांच्या सिनेमासाठी लाज नसल्याप्रमाणे मला फोन करतात आणि बोलवतात. आलियाने मला राजी सिनेमाचा ट्रेलर पाठवून, तो पाहण्याची विनंती केली होती. राजीचा ट्रेलर पाहिल्यानंतर मी मेघना गुलजार आणि आलियाला फोन केला होता. मात्र माझ्या चित्रपटासाठी काही प्रतिसाद दिला नाही. आमीर खानने मला दंगल आणि सीक्रेट सुपरस्टारसाठी फोन केला होता. आमीर खान आणि ट्विंकल खन्ना महिला सशक्तीकरणावर तासभर चर्चा करतात. मात्र त्यांना माझ्या चित्रपटासाठी वेळ नसतो. हे माझ्या विरोधात मोठे रॅकेट सुरु आहे, असा आरोप कंगनाने केला होता.

Published On - 11:58 am, Fri, 8 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI