दिल्लीत पोहोचताच विंग कमांडर अभिनंदन ताबिशला कडकडून भेटले!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

नवी दिल्ली: भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान (Abhinandan Varthaman returns) हे तब्बल साठ तासांनी अटारी वाघा (wagah border) सीमेवरून पाकिस्तानातून मायदेशी परतले. पाकिस्तानी रेंजर्स आणि सीमा सुरक्षा दल यांच्यातली कागदपत्रांची पूर्तता पूर्ण झाल्यानंतर अभिनंदन यांनी 1 मार्चला रात्री सव्वा नऊच्या सुमारास भारतीय सीमेत प्रवेश केला. वाघा बॉर्डरवर अभिनंदन वर्धमान या विजयीवीराचं जल्लोषी स्वागत […]

दिल्लीत पोहोचताच विंग कमांडर अभिनंदन ताबिशला कडकडून भेटले!
Follow us on

नवी दिल्ली: भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान (Abhinandan Varthaman returns) हे तब्बल साठ तासांनी अटारी वाघा (wagah border) सीमेवरून पाकिस्तानातून मायदेशी परतले. पाकिस्तानी रेंजर्स आणि सीमा सुरक्षा दल यांच्यातली कागदपत्रांची पूर्तता पूर्ण झाल्यानंतर अभिनंदन यांनी 1 मार्चला रात्री सव्वा नऊच्या सुमारास भारतीय सीमेत प्रवेश केला. वाघा बॉर्डरवर अभिनंदन वर्धमान या विजयीवीराचं जल्लोषी स्वागत करण्यात आलं. ढोल-ताशे, हार तुऱ्यांसह भारतीय नागरिकांनी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचं स्वागत केलं.

वाचा: पाकिस्तानातून अभिनंदन यांना घेऊन येणारी ही महिला कोण?

दरम्यान, अभिनंदन यांना वाघा अटारी बॉर्डरवरुन अमृतसरला नेण्यात आलं. त्यानंतर काल रात्रीच विशेष विमानाने दिल्लीला आणण्यात आलं. दिल्लीतील पालम एअरपोर्टवरही त्यांचं जल्लोषी स्वागत करण्यात आलं. दिल्लीत आज त्यांचं मेडिकल चेकअप होणार आहे.

कुटुंबीयांची गळाभेट
विंग कमांडर अभिनंदन यांची दिल्लीतील पालम विमानतळावर कुटुंबीयांशी भेट झाली. यावेळी त्यांचे आई-वडील, पत्नी आणि मुलगा उपस्थित होता. या सर्वांची अभिनंदन यांनी कडकडून भेट घेतली. अभिनंदन यांचे वडील एअर मार्शल एस. वर्थमान, आई शोभा, पत्नी तन्वी आणि मुलगा ताबिश या सर्वांना अभिनंदन भेटले. त्यानंतर वायूसेनेने अभिनंदन यांना आर आर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. या रुग्णालयात त्यांची शारिरीक आणि मानसिक तपासणी करण्यात येत आहे.

जिनेव्हा करार नाही, या पाच गोष्टींमुळे अभिनंदन यांची सुटका ऐतिहासिक!

नाश्त्याला इडली
अभिनंदन यांनी आज सकाळी इडलीसह हलका नाश्ता केला.

पुढची प्रक्रिया काय?

1.अभिनंदनला थेट हवाई दलाच्या गुप्तचर विभागात नेले
2 गुप्तचर विभागात अनेक वैद्यकीय चाचण्या आणि तंदुरुस्ती तपासणार
3 पाकिस्ताननं अभिनंदनच्या शरिरात हेरगिरी करणारे डिव्हाईस लावले आहे का याची तपासणी करणार
4. ‘बग’ वगैरे केले आहे का त्याचे स्कॅन करणार
5. अभिनंदनची मानसोपचार चाचण्या घेणार. टॉर्चर केले का ते तपासणार
6. रॉ आणि गुप्तचर विभाग चौकशी करणार

ढाण्या वाघाची ग्रँड एण्ट्री! विंग कमांडर अभिनंदन पिस्तुलसह मायभूमीत!

पाकिस्तानच्या F16 या विमानाचा पाठलाग करुन त्याला जमिनीवर पाडणारा भारताचा ढाण्या वाघ, वायूदलाचा विंग कमांडर अभिनंदन वर्धमान अखेर पाकिस्तानच्या तावडीतून सुटून, मायदेशी परतला. वाघा बॉर्डरवर  अभिनंदन वर्धमान या विजयीवीराचं जल्लोषी स्वागत करण्यात आलं. ढोल-ताशे, हार तुऱ्यांसह भारतीय नागरिकांनी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचं स्वागत केलं.  पाकिस्तानी रेंजर्सने विंग कमांडर अभिनंदन यांची पिस्तुल परत करत, मानाने त्यांना पाठवलं. सीमेवर जवळपास 8 तासांची औपचारिकता पूर्ण करुन अभिनंदन भारतात परतले.

ती महिला कोण?

वाघा बॉर्डरवर अभिनंदन यांनी भारताच्या भूमीत पहिलं पाऊल ठेवलं तेव्हा त्यांच्यासोबत एक महिला होती. ही महिला कोण असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. पण त्या पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयात भारताच्या संचालक डॉ. फरिहा बुगती आहेत. (dr fariha bugti) फरिहा या अभिनंदन यांच्यासोबत वाघा बॉर्डरवर आल्या आणि त्यांनी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करुन अभिनंदन यांना बीएसएफ आणि वायूसेनेच्या अधिकाऱ्यांकडे सोपवलं.

संबंधित बातम्या 

पाकिस्तानातून अभिनंदन यांना घेऊन येणारी ही महिला कोण?  

विंग कमांडर अभिनंदन यांचं BCCI कडून हटके स्वागत  

प्रत्येकाच्या ओठावर एकच शब्द – Welcome Home Abhinandan  

भारतात येण्यापूर्वी अभिनंदन यांची बळजबरी मुलाखत, छेडछाड केलेला व्हिडीओ शेअर  

जिनेव्हा करार नाही, या पाच गोष्टींमुळे अभिनंदन यांची सुटका ऐतिहासिक!