पाकिस्तानातून अभिनंदन यांना घेऊन येणारी ही महिला कोण?

वाघा बॉर्डर/नवी दिल्ली : पाकिस्तानच्या F16 या विमानाचा पाठलाग करुन त्याला जमिनीवर पाडणारा भारताचा ढाण्या वाघ, वायूदलाचा विंग कमांडर अभिनंदन वर्धमान अखेर पाकिस्तानच्या तावडीतून सुटून, मायदेशी परतला. वाघा बॉर्डरवर  अभिनंदन वर्धमान या विजयीवीराचं जल्लोषी स्वागत करण्यात आलं. ढोल-ताशे, हार तुऱ्यांसह भारतीय नागरिकांनी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचं स्वागत केलं.  पाकिस्तानी रेंजर्सने विंग कमांडर अभिनंदन यांची …

News India, पाकिस्तानातून अभिनंदन यांना घेऊन येणारी ही महिला कोण?

वाघा बॉर्डर/नवी दिल्ली : पाकिस्तानच्या F16 या विमानाचा पाठलाग करुन त्याला जमिनीवर पाडणारा भारताचा ढाण्या वाघ, वायूदलाचा विंग कमांडर अभिनंदन वर्धमान अखेर पाकिस्तानच्या तावडीतून सुटून, मायदेशी परतला. वाघा बॉर्डरवर  अभिनंदन वर्धमान या विजयीवीराचं जल्लोषी स्वागत करण्यात आलं. ढोल-ताशे, हार तुऱ्यांसह भारतीय नागरिकांनी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचं स्वागत केलं.  पाकिस्तानी रेंजर्सने विंग कमांडर अभिनंदन यांची पिस्तुल परत करत, मानाने त्यांना पाठवलं. सीमेवर जवळपास 8 तासांची औपचारिकता पूर्ण करुन अभिनंदन भारतात परतले.

वाघा बॉर्डरवर अभिनंदन यांनी भारताच्या भूमीत पहिलं पाऊल ठेवलं तेव्हा त्यांच्यासोबत एक महिला होती. ही महिला कोण असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. पण त्या पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयात भारताच्या संचालक डॉ. फरिहा बुगती आहेत. फरिहा या अभिनंदन यांच्यासोबत वाघा बॉर्डरवर आल्या आणि त्यांनी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करुन अभिनंदन यांना बीएसएफ आणि वायूसेनेच्या अधिकाऱ्यांकडे सोपवलं.

अभिनंदन यांना अटक झाल्यापासून पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयासोबतचा सर्व संवाद फरिहा यांच्यामार्फतच पूर्ण झाला. एवढंच नव्हे, तर फरिहा या भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांचं प्रकरणही पाहत आहेत. कुलभूषण हे सध्या पाकिस्तानच्या तुरुंगात असून त्यांचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुरु आहे.

विंग कमांडर अभिनंदन यांनी भारतात पाय ठेवला तो क्षण

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *