भारतात येण्यापूर्वी अभिनंदन यांची बळजबरी मुलाखत, छेडछाड केलेला व्हिडीओ शेअर

वाघा बॉर्डर/नवी दिल्ली : पाकिस्तानच्या F16 या विमानाचा पाठलाग करुन त्याला जमिनीवर पाडणारा भारताचा ढाण्या वाघ, वायूदलाचा विंग कमांडर अभिनंदन वर्धमान अखेर पाकिस्तानच्या तावडीतून सुटून, मायदेशी परतला. वाघा बॉर्डरवर  अभिनंदन वर्धमान या विजयीवीराचं जल्लोषी स्वागत करण्यात आलं. ढोल-ताशे, हार तुऱ्यांसह भारतीय नागरिकांनी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचं स्वागत केलं. पाकिस्तानी रेंजर्सने विंग कमांडर अभिनंदन यांची …

भारतात येण्यापूर्वी अभिनंदन यांची बळजबरी मुलाखत, छेडछाड केलेला व्हिडीओ शेअर

वाघा बॉर्डर/नवी दिल्ली : पाकिस्तानच्या F16 या विमानाचा पाठलाग करुन त्याला जमिनीवर पाडणारा भारताचा ढाण्या वाघ, वायूदलाचा विंग कमांडर अभिनंदन वर्धमान अखेर पाकिस्तानच्या तावडीतून सुटून, मायदेशी परतला. वाघा बॉर्डरवर  अभिनंदन वर्धमान या विजयीवीराचं जल्लोषी स्वागत करण्यात आलं. ढोल-ताशे, हार तुऱ्यांसह भारतीय नागरिकांनी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचं स्वागत केलं. पाकिस्तानी रेंजर्सने विंग कमांडर अभिनंदन यांची पिस्तुल परत करत, मानाने त्यांना पाठवलं. सीमेवर जवळपास 8 तासांची औपचारिकता पूर्ण करुन अभिनंदन भारतात परतले.

अभिनंदन यांचं स्वागत करण्यासाठी उत्सुक असलेल्या भारतीयांना पाकिस्तानने जाणीवपूर्वक वाट पाहायला लावली. भारतीय वायूसेने आणि बीएसएफचे अधिकारी वाघा बॉर्डरवर अभिनंदन यांच्या स्वागतासाठी तीन वाजल्यापासून वाट पाहत होतो. पण दोन वेळा वेळ वाढवून घेत पाकिस्तानने सव्वा नऊ वाजता अभिनंदन यांना भारताच्या ताब्यात दिलं.

लाहोरमध्ये औपचारिकता पूर्ण करण्यात आली आणि तिथून पुढे अभिनंदन यांना बॉर्डरवर आणण्यात आलं. यापूर्वी पाकिस्तानने अभिनंदन यांची बळजबरी मुलाखत घेतली. पण नेहमीप्रमाणे पाकिस्तानने नापाकपणा करत छेडछाड केलेला व्हिडीओ जारी केलाय. ज्यात अभिनंदन पाकिस्तानी लष्कारचं कौतुक करत आहेत आणि भारतीय मीडियाविषयी अपशब्द वापरत आहेत.

पाकिस्तानमधील अनेक चॅनल्सकडून हा व्हिडीओ जारी करण्यात आलाय. पण हा व्हिडीओ पाहताना दिसून येतं की अनेक ठिकाणी कट मारण्यात आले आहेत. त्यामुळे पाकिस्तानने अभिनंदन यांचा चेहरा वापरुन स्वतःची गरळ ओकल्याचं स्पष्ट होतंय. यामध्ये पाकने स्वतःच्या आर्मीचं कौतुक केलंय, तर भारतीय मीडियावर निशाणा साधलाय.

व्हिडीओ पाहा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *