जालन्यात वेश्या व्यवसायाचा अड्डा उध्वस्त, हॉटेल मालकासह दोघांना अटक, गुन्हे शाखेची कारवाई

| Updated on: Oct 18, 2020 | 12:47 AM

जालना स्थानिक गुन्हे शाखेने हॉटेल ऋतुराजमधील वेश्या व्यवसायाचा अड्डा उध्वस्त केला आहे.

जालन्यात वेश्या व्यवसायाचा अड्डा उध्वस्त, हॉटेल मालकासह दोघांना अटक, गुन्हे शाखेची कारवाई
Follow us on

जालना : जालना स्थानिक गुन्हे शाखेने हॉटेल ऋतुराजमधील वेश्या व्यवसायाचा अड्डा उध्वस्त केला आहे (Jalna Crime Branch ). यावेळी पोलिसांनी दोन ग्राहकांसह दोन महिलांना पकडलं आहे. आयपीएस हसन गोहर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिह गोर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे (Jalna Crime Branch ).

हॉटेल मालक गोविंद बावणे यांच्यासह दोन ग्राहकांना जेरबंद करण्यात आलं आहे. जालना -राजूर रोडवरील हॉटेल ऋतुराज बियरबार आणि लॉजिंग या हॉटेलमध्ये बाहेरुन महिलांना बोलावून घेऊन अवैधरित्या वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक हसन गोहर यांच्यासह पोलीस निरीक्षक राजेंद्रसिह गौर यांच्या एलसीबी पथकाने पंटर पाठवून धाड टाकली. यावेळी हॉटेलची झाडाझडती घेतली असता, लॉजमधील दोन वेगवेळ्या खोल्यांमध्ये दोन महिला दोन ग्राहकांसोबत आढळून आल्या. या दोन महिलांपैकी एक अल्पवयीन असून दुसरी महिला 22 वर्षांची आहे.

यावेळी घेतलेल्या झाडाझडतीत लॉजमध्ये मोठ्या प्रमाणात कंडोमचा साठा आणि अवैध देशी आणि विदेशी दारुचा मोठा साठा आढळून आला. रात्री उशिरापर्यंत पोलिसांमार्फत या हॉटेलची झडती सुरुच होती. याप्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची कारवाई सुरु आहे. पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक (आयपीएस) हसन गोहर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी कारवाई केली.

Jalna Crime Branch

संबंधित बातम्या :

नागपुरात तलवार, सुरीसारख्या घातक शस्त्रांचा साठा जप्त, दोघांना अटक

धक्कादायक..दारुड्या मुलानं केला वडिलांचा खून, अमरावतीमधील घटना