AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bachchan Family Corona report: जया बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्याचा कोरोना अहवाल निगेटीव्ह

बच्चन कुटुंबातील सर्व सदस्यांच्या कोरोना चाचणी घेण्यात करण्यात आल्या आहेत. (Jaya Aishwarya Bachchan Family Corona report).

Bachchan Family Corona report: जया बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्याचा कोरोना अहवाल निगेटीव्ह
| Updated on: Jul 12, 2020 | 8:29 AM
Share

Bachchan Family Corona report मुंबई : बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन या दोघांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सर्वांच्याच कोरोनाच्या चाचणी घेण्यात आल्या आहेत (Jaya Aishwarya Bachchan Family Corona report). बच्चन पिता-पुत्रांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली जात होती. मात्र, बच्चन कुटुंबियांना काहीसा दिलासा मिळाला आहे. खासदार जया बच्चन, अभिनेत्र ऐश्वर्या बच्चन आणि आराध्या बच्चन यांचे कोरोना अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

आज (12 जुलै) दुपारपर्यंत बच्चन कुटुंबातील इतर लोकांच्या कोरोना चाचणीचे अहवाल येणार आहेत. मात्र, माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार बच्चन कुटुंबातील जया बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांचे कोरोना अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अधिकृतरित्या याबाबत दुपारीच माहिती मिळणार आहे. अमिताभ बच्चन यांचे इतर नातेवाईकही त्यांच्यासोबत राहत असल्याचंही बोललं जात आहे. त्यांच्याही कोरोना चाचणी घेण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्त त्यांच्या घरातील सर्व कर्मचाऱ्यांचे देखील स्वॅब नमुने घेण्यात आले आहेत. त्यांचेही अहवाल लवकरच येणार आहेत.

अमिताभ बच्चन याचं घर मुंबई महानगरपालिकेच्या के वेस्ट वार्डात (BMC K West Ward) येते. या वार्डात आतापर्यंत एकूण 5 हजार 300 कोरोना रुग्ण आढळले आहेत. यापैकी अनेकजण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या येथे 1 हजार 445 सक्रीय रुग्ण आहेत. या वार्डात आतापर्यंत 241 जणांचा मृत्यू झाला आहे.

अभिषेक बच्चन यांचे ट्विट

“माझ्या आणि माझ्या वडिलांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आमच्या दोघांमध्येही कोरोनाची सौम्य लक्षण आहेत.सध्या रुग्णालयात आमच्यावर उपचार सुरु आहेत,” अशी माहिती ट्विट करत अभिषेक बच्चन यांनी दिली.

अमिताभ बच्चन यांचे ट्विट

“माझा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच माझ्या कुटुंबाला आणि घरातील इतर स्टाफच्याही कोरोना चाचण्या झाल्या आहेत. त्यांच्या चाचणीचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही,” असे ट्विट अमिताभ बच्चन यांनी केले आहे.

“तसेच गेल्या दहा दिवसात माझ्या संपर्कात जे व्यक्ती आले त्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करावी,” असेही बिग बींनी  ट्विटमध्ये म्हटले आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच अनेक कलाकारांनी रिट्विट करत त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना केली आहे. सोनम कपूर, क्रिती खरबंदा, दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू यासारख्या अनेक कलाकारांनी ट्विटवर रिट्विट केलं आहे.

संबंधित बातम्या :

LIVE: Amitabh Bachchan Corona | अमिताभ बच्चन आणि अभिषेकला कोरोना

Amitabh Bachchan Corona | अमिताभ बच्चन आणि अभिषेकला कोरोना, बॉलिवूड सेलिब्रेटींकडून लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना

Jaya Aishwarya Aaradhya Bachchan Corona report

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.