Amitabh Bachchan Corona | अमिताभ बच्चन आणि अभिषेकला कोरोना

महानायक अमिताभ बच्चन आणि पुत्र अभिनेता अभिषेक बच्चन या दोघांना कोरोनाची लागण झाली (Amitabh Bachchan Corona Positive) आहे.

Amitabh Bachchan Corona | अमिताभ बच्चन आणि अभिषेकला कोरोना
Follow us
| Updated on: Jul 12, 2020 | 9:13 AM

Amitabh Bachchan Corona मुंबई : महानायक अमिताभ बच्चन आणि पुत्र अभिनेता अभिषेक बच्चन या दोघांना कोरोनाची लागण झाली (Amitabh Bachchan Corona Positive) आहे. बच्चन पिता-पुत्रांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली.  सुदैवाने बच्चन कुटुंबातील इतर सदस्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची सौम्य लक्षण आहेत. त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहे. बच्चन पिता-पुत्रांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. सुदैवाने अमिताभ यांच्या पत्नी अभिनेत्री जया बच्चन आणि सून अभिनेत्री ऐश्वर्या राय यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तसेच कुटुंबातील इतर सदस्यांचा रिपोर्टही निगेटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे.

अभिषेक बच्चन यांचे ट्विट

“माझ्या आणि माझ्या वडिलांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आमच्या दोघांमध्येही कोरोनाची सौम्य लक्षण आहेत.सध्या रुग्णालयात आमच्यावर उपचार सुरु आहेत,” अशी माहिती ट्विट करत अभिषेक बच्चन यांनी दिली.

अमिताभ बच्चन यांचे ट्विट

“माझा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच माझ्या कुटुंबाला आणि घरातील इतर स्टाफच्याही कोरोना चाचण्या झाल्या आहेत. त्यांच्या चाचणीचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही,” असे ट्विट अमिताभ बच्चन यांनी केले आहे.

“तसेच गेल्या दहा दिवसात माझ्या संपर्कात जे व्यक्ती आले त्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करावी,” असेही बिग बींनी  ट्विटमध्ये म्हटले आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच अनेक कलाकारांनी रिट्विट करत त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना केली आहे. सोनम कपूर, क्रिती खरबंदा, दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू यासारख्या अनेक कलाकारांनी ट्विटवर रिट्विट केलं आहे.

त्यांच्या ट्विटरवर आतापर्यंत जवळपास 56 हजार रिट्विट करण्यात आले आहे. तसेच अनेक चाहते अमिताभ यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

याआधी त्यांना किडनीचा त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळत होती. तसेच यापूर्वी अनेकदा ते रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात जात असतात.

अमिताभ बच्चन लवकरच अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ब्रह्मास्त्र चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय आयुष्मान खुरानाच्या गुलाबो-सिताबो चित्रपटात बिग बींनी काम केले आहे. गुलाबो सिताबो हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता. तसेच सध्या अमिताभ बच्चन हे प्रसिद्ध टिव्ही शो ‘कौन बनेगा करोडपती’ च्या 12 व्या भागाची तयारी करत (Amitabh Bachchan Corona Positive) आहेत.

संबंधित बातम्या : 

Veteran Actor Jagdeep : ‘शोले’तला सुरमा भोपाली काळाच्या पडद्याआड, अभिनेते जगदीप यांचे निधन

Sushant Singh Rajput Case | आधी 30 जणांचे खुले जबाब, आता मात्र पोलिसांकडून छुपी चौकशी

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.