Veteran Actor Jagdeep : ‘शोले’तला सुरमा भोपाली काळाच्या पडद्याआड, अभिनेते जगदीप यांचे निधन

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते आणि विनोदवीर जगदीप यांचं निधन (Bollywood actor Jagdeep passed away) झालं.

Veteran Actor Jagdeep : 'शोले'तला सुरमा भोपाली काळाच्या पडद्याआड, अभिनेते जगदीप यांचे निधन

मुंबई : बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते आणि विनोदवीर जगदीप यांचं निधन (Bollywood actor Jagdeep passed away) झालं. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी वयाच्या 81 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी जवळपास 400 हून अधिक चित्रपटात काम केले आहे. विनोदाची उत्तम जाण असलेले म्हणून त्यांना बॉलिवूडमध्ये ओळखले जाते. त्यांची ‘शोले’ चित्रपटातील सूरमा भोपाली ही भूमिका प्रचंड गाजली.

अभिनेते जगदीप यांची माहिती 

जगदीप यांचा जन्म 29 मार्च 1939 रोजी मध्य प्रदेशच्या दतिया गावात झाला होता. जगदीप यांचे संपूर्ण नाव सय्यद इश्ताक अहमद जाफरी असे होते. त्यांनी जवळपास 400 पेक्षा अधिक चित्रपटात काम केले आहे. शोले, पुराना मंदिर, अंदाज अपना अपना, बिदाई, एजंट विनोद यासारख्या अनेक चित्रपटात काम केले.

जगदीप यांनी बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत पदापर्ण केले. बी.आर. चोप्रा यांच्या अफसाना या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले. अब दिल्ली दूर नही, मुन्ना, आरपार, दो बिघा जमीन, हम पंछी एक डाल के यासारख्या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले आहे.

जगदीप यांनी 1975 साली ‘शोले’ चित्रपटात साकारलेल्या सुरमा भोपाली या पात्राने प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. त्यानंतर काही वर्षांनी सुरमा भोपाली नावाचा चित्रपटही तयार केला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन त्यांनी स्वत: केलं होतं.

जगदीप यांनी ‘अंदाज अपना अपना’, ‘पुराना मंदिर’, ‘कुर्बानी’, ‘शहेनशा’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

त्यानतंर बिमल रॉय यांच्या दो बिघा जमीन या चित्रपटाद्वारे विनोदी भूमिकेस सुरूवात केली.  हम पंछी एक डाल के या चित्रपटासाठी त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी विनोदी चित्रपटांसह अनेक हॉरर चित्रपटातही काम केले (Bollywood actor Jagdeep passed away) आहे.

संबंधित बातम्या :

Saroj Khan Dies | बॉलिवूडची लाडकी कोरिओग्राफर काळाच्या पडद्याआड, सरोज खान यांचे निधन

Bollywood Celebrities | 2020 च्या सहा महिन्यात मनोरंजन विश्वाने गमावले 20 हिरे!

Published On - 10:50 pm, Wed, 8 July 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI