AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याण-डोंबिवलीत केटीएम बाईकच्या सहाय्याने चोरी, चोरट्याला अटक

कल्याण डोंबिवलीत केटीएम बाईकच्या सहाय्याने चोरी करणाऱ्या चोरट्याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. (Kalyan  KTM Bike theft thieves mobile and gold chain) 

कल्याण-डोंबिवलीत केटीएम बाईकच्या सहाय्याने चोरी, चोरट्याला अटक
| Updated on: Oct 07, 2020 | 3:16 PM
Share

कल्याण : कल्याण डोंबिवलीत केटीएम बाईकच्या सहाय्याने चोरी करणाऱ्या चोरट्याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या काही दिवसापासून या चोरट्याने कल्याण डोंबिवली परिसरात धुमाकूळ घातला होता. धनंजय पाटील असे या चोराचे नाव आहे. कल्याणच्या खडकपाडा पोलिसांना त्याला बेड्या ठोकण्यात यश आले आहे. (Kalyan  KTM Bike theft thieves mobile and gold chain)

राज्यात अनलॉक सुरु असल्याने अनेक नागरिक कामानिमित्ताने घराबाहेर पडत आहे. त्यातच कल्याण-डोंबिवलीत चोरी आणि चैन स्नॅचिंगचे प्रकार वाढले आहे. रस्त्यावर फिरताना किंवा वॉक करताना अनेक नागरिक मोबाईलवर बोलण्यात व्यस्त असतात. त्याचाच फायदा घेत हा चोरटा चोरी करायचा.

केटीएम या प्रसिद्ध बाईकच्या सहाय्याने हा चोरटा चोरी करायचा. नागरिकांच्या हातातील मोबाईल हिसकावून पळून जायचा. तर कधी सोनसाखळीही ओढत पळ काढायचा.

काही दिवसांपूर्वी त्याने कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच मोबाईल हिसकावून पळ काढला होता. त्यावेळी पोलिसांकडे केवळ तो मोबाईल हिसकावून पळून जातो, एवढची माहिती होती.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत अटक केली आहे. धनंजय पाटील असे या चोराचे नाव असून तो पडघा या ठिकाणा राहतो. त्याच्या विरोधात वेगवेगळ्या पोलिसात अनेक गुन्हे दाखल झाले आहेत.

त्याच्याकडून आतापर्यंत 12 मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे. त्याच्याकडून इतरही काही मोबाईल हस्तगत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी धनंजय पाटील याला अटक करीत त्याची केटीएम बाईक जप्त केली आहे.(Kalyan  KTM Bike theft thieves mobile and gold chain)

संबंधित बातम्या :

Pune Murder | पुण्यात तरुणाला दगडाने ठेचलं, दहा दिवसात कोंढव्यातील तिसरे हत्याकांड

15 दिवसांपूर्वी दुचाकी लंपास, चोरी केलेल्या बाईकचा फोटो फेसबुकवर पोस्ट, पोलिसांकडून चोरट्याला अटक

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.