AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Katrina Kaif | …तर कतरिना कैफ बॉलिवूडमधील पहिली अभिनेत्री ठरेल!

बॉलिवूडमध्ये बऱ्याच बर्षांपासून चर्चेत असलेला सुपरहीरोवर आधारित चित्रपट आता तयार होणार आहे. बॉलिवूड आभिनेत्रींमध्ये सुपरहिरो चित्रपटात काम करणारी कतरिना कैफ पहिली अभिनेत्री ठरणार आहे.

Katrina Kaif | ...तर कतरिना कैफ बॉलिवूडमधील पहिली अभिनेत्री ठरेल!
| Updated on: Oct 30, 2020 | 7:36 PM
Share

मुंबई : बॉलिवूडमध्ये बऱ्याच बर्षांपासून चर्चेत असलेला सुपरहीरोवर आधारित चित्रपट आता तयार होणार आहे. बॉलिवूड आभिनेत्रींमध्ये सुपरहिरो चित्रपटात काम करणारी कतरिना कैफ पहिली अभिनेत्री ठरणार आहे. हॉलीवूडमध्ये सुपरहिरो चित्रपटांचा ट्रेंड खूप जुना आहे. पण जेव्हा बॉलिवूडची गोष्ट येते तेव्हा क्रिश हा एकमेव चित्रपट सुपरहिरो आपल्या डोळ्यांसमोर येतो. पण आता चित्रपट दिग्दर्शक अली अब्बास जफरने तो ट्रेंड बदलण्याची तयारी केली आहे. आता बॉलिवूडमध्ये एक नव्हे, दोन नव्हेतर तब्बल चार सुपरहिरो असलेला चित्रपट बनवण्याचा मानस अली अब्बास जफरने ठेवला आहे. ( Katrina Kaif Superhero Movie Ali Abbas Zafar No Male Actor)

या चित्रपटात कतरिना कैफ सुपरहीरोच्या भूमिकेत दिसणार आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या चित्रपटात कोणताही अभिनेता असणार नाही. या चित्रपटाची संपूर्ण जबाबदारी एकटा कतरिना कैफवर असणार आहे. स्वत: अली अब्बास जफर यांनी एका मुलाखतीत सांगितले की, मी जो सुपरहिरो चित्रपट तयार करणार आहे, त्यामध्ये कोणताही अभिनेता दिसणार नाहीय.’ कतरिना कैफसारख्या एका उत्कृष्ट अभिनेत्रीला चित्रपटात अभिनेत्याची काय गरज? बॉलिवूडमध्ये एक नव्हेतर अजून चार सुपरहीरो चित्रपट तयार करणार असल्याचे अली अब्बास जफर म्हणाले. कतरिना कैफसोबत त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. त्यानंतर ‘मिस्टर इंडिया’ थीमवर एक चित्रपट बनविला जाईल. तिसरा सुपरहीरो पुराणांतून घेतला जाईल आणि चौथा भारतीय सैन्यातून घेतला जाणार आहे. अली अब्बास जफर हे महत्वाकांक्षी विचार त्यांच्या चाहत्यांना आवडले आहेत. लवकरच आता बॉलिवूडमध्ये एक नवीन ट्रेंड पाहायला मिळणार आहे. कतरिनाचे ‘गाडी’ प्रेम गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड कलाकारांना महागड्या गाड्या खरेदी करण्याचीा छंद जडला आहे. बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने नवी कोरी रेंज रोव्हर कार खरेदी केली आहे. कतरिना कैफने अल्ट्रा लग्जरी रेंज रोव्हर SE Vogue एसयूव्ही खरेदी केली होती. या गाडीची किंमत 2 कोटी 37 लाख रुपये आहे. कतरिनाने खरेदी केलेल्या गाडीचा रंग पांढरा आहे. विशेष म्हणजे या गाडीच्या टॅक्स, रजिस्ट्रेशन आणि इतर गोष्टींसाठी कतरीनाने तब्बल 35 लाख रुपये भरले आहेत. कतरिनाने अल्ट्रा लग्जरी रेंज रोव्हर SE Vogue एसयूव्ही ही गाडी खऱेदी केली आहे. यातील लाँग व्हीड बेस मॉडेलची तिची गाडी आहे. या गाडीत 4.4 लीटर एसडी-व्ही 8 टर्बोचार्ज डिझेल इंजिन आहे. यात पॅडेल शिफ्टर्ससोबत 8 स्पीड ऑटोमैटिक ट्रान्समिशन मिळते. कतरीनाने खरेदी केलेल्या या गाडीचा नंबर 8822 असा आहे.सध्या कतरिनाकडे 3 ते 4 महागड्या गाड्या आहेत. त्या गाड्यांची किंमत प्रत्येक 50 ते 65 लाख रुपये आहे. काही महिन्यांपूर्वीच कतरिनाने ऑडी कार खरेदी केली होती.

संबंधित बातम्या : 

Bigg Boss 14 | जास्मीन भसीनला पाहून सलमानला कतरिना आठवली!

Shahrukh Khan | किंग खानचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, आर. माधवनसोबत ‘या’ भूमिकेत झळकणार!

( Katrina Kaif Superhero Movie Ali Abbas Zafar No Male Actor)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.