AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Happy Birthday Lata Mangeshkar | लता मंगेशकर यांच्या आयुष्यातील ‘10’ विस्मयकारक गोष्टी!

वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी संपूर्ण घराची जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेत, त्या कामानिमित्ताने मुंबईत आल्या. संगीत क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात केल्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

Happy Birthday Lata Mangeshkar | लता मंगेशकर यांच्या आयुष्यातील ‘10’ विस्मयकारक गोष्टी!
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Sep 28, 2020 | 1:03 PM
Share

मुंबई : ‘भारतरत्न’ लता मंगेशकर यांच्या सुमधुर आवाजाने अवघ्या विश्वाला भुरळ घातली आहे. लता मंगेशकर भारतीय संगीत विश्वाच्या एक अविभाज्य भाग आहेत. वयाच्या 13व्या वर्षी त्यांच्या सांगीतिक प्रवासाला सुरुवात झाली होती. आजपर्यंत त्यांनी अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींसाठी पार्श्वगायन केले आहे. या ‘सुरांच्या राणी’ने अवघ्या रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. त्यांचा हा संघर्षमय प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. आज (28 सप्टेंबर) लतादीदी आपला 91वा वाढदिवस (Birthday) साजरा करत आहेत (Lata Mangeshkar Birthday Special 10 unknown facts).

50 हजारहून अधिक गाण्यांनी श्रोत्यांना केले मंत्रमुग्ध

भारताच्या ‘गानकोकिळा’ लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी 36 भाषांमध्ये तब्बल 50 हजारहून अधिक गाणी गायली आहेत. वयोमानापरत्वे त्या सध्या संगीत क्षेत्रापासून दूर असल्या तरी, त्यांच्या कलाकृती आजच्या नव्या दमाच्या गायक-गायिकांना भुरळ पडतात. लतादीदींचा हा प्रवास तितकासा सोपा नव्हता. वयाच्या 13व्या वर्षी संपूर्ण घराची जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेत, त्या कामानिमित्ताने मुंबईत आल्या. संगीत क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात केल्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

आज वाढदिवसानिमित्ताने आपण त्यांच्या आयुष्यात 10 विस्मयकारक गोष्टींबद्दल (Unknown Facts) जाणून घेणार आहोत.

  • लता मंगेशकर यांचे खरे नाव होते ‘हेमा’. वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ‘भाव बंधन’ या नाटकातील प्रसिद्ध व्यक्तिरेखा ‘लतिका’वरून त्यांचे नाव ‘लता’ असे ठेवण्यात आले.
  • शाळेत जाताना बहिण आशाला सोबत नेता येणार नाही म्हणून, लता मंगेशकर (Lata Mangeshkar) केवळ एकच दिवस शाळेत गेल्या होत्या.
  • ‘पातळ आवाज’ असल्याचे कारण देत प्रसिद्ध निर्माते शशिधर मुखर्जी यांनी लता मंगेशकर यांना काम देण्यास नकार दिला होता.
  • लता मंगेशकर सुरुवातीच्या काळात नामांकित पार्श्वगायिका आणि अभिनेत्री नूरजहां यांच्या आवाजाचे अनुकरण करायच्या.
  • लता मंगेशकर यांनी निषेध व्यक्त केल्यानंतर 1959पासून ‘फिल्मफेअर पुरस्कारा’त ‘सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक/गायिका’ ही श्रेणी सुरू करण्यात आली. (Lata Mangeshkar Birthday Special 10 unknown facts)
  • लता मंगेशकर यांच्यावर अज्ञात व्यक्तीकडून विष प्रयोग करण्यात आला होता. त्यामुळे जवळपास तीन महिने त्या अंथरुणाला खिळल्या होत्या.
  • 26 जानेवारी 1963 रोजी लता मंगेशकर ‘ए मेरे वतन के लोगो’ हे प्रसिद्ध गीत सादर करत असताना पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.
  • ‘ए मेरे वतन के लोगो’ ही गाणे दोन आवाजांत रेकॉर्ड केले जाणार होते. विशेष म्हणजे स्वतः लतादीदी आणि आशा भोसले (Asha Bhosle) या गाण्याला आवाज देणार होत्या. परंतु, ते गाणे केवळ लतादीदींनी गावे असा आग्रह धरण्यात आल्याने, संपूर्ण गाणे त्यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आले.
  • 1974मध्ये लंडनच्या ‘रॉयल अल्बर्ट हॉल’मध्ये सादरीकरण करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.
  • राज कपूर यांचा 1978मध्ये प्रदर्शित झालेला ‘सत्यम शिवम सुंदरम’ हा चित्रपट लता मंगेशकर यांच्या जीवन कथेवरून प्रेरित होता. या चित्रपटात लता मंगेशकर यांनी काम करावे अशी त्यांची इच्छा होती.

(Lata Mangeshkar Birthday Special 10 unknown facts)

संबंधित बातम्या : 

Happy Birthday Lata Mangeshkar | 36 भाषांत 50 हजारहून अधिक गाणी गाणाऱ्या लतादीदी वडिलांसमोर राहायच्या गप्प!

जयप्रभा स्टुडिओच्या विभाजनासाठी लतादीदींचा प्रस्ताव, कोल्हापूरकरांमध्ये संताप

लता मंगेशकरांना रुग्णालयातून डिस्चार्ज, चाहत्यांसह उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे ट्विटवरुन आभार

“नरेंद्रभाई आपके लिए मेरी ये राखी”, भेट म्हणून लता मंगेशकरांनी पंतप्रधान मोदींकडून घेतलं ‘हे’ वचन

Follow Us
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला.

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला

IND vs ZIM: मॅचच्या 24 तासआधी झिम्बाब्वेने भारतीय संघाला दिलं ओपन चॅलेंज, अचानक मोठा निर्णय घेतला.

IND vs ZIM: मॅचच्या 24 तासआधी झिम्बाब्वेने भारतीय संघाला दिलं ओपन चॅलेंज, अचानक मोठा निर्णय घेतला

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report.

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report