लता मंगेशकरांना रुग्णालयातून डिस्चार्ज, चाहत्यांसह उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे ट्विटवरुन आभार

लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. नुकतंच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला (Lata Mangeshkar Discharged)  आहे.

लता मंगेशकरांना रुग्णालयातून डिस्चार्ज, चाहत्यांसह उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे ट्विटवरुन आभार

मुंबई : प्रसिद्ध गायिका गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना (11 नोव्हेंबर) ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात (Lata Mangeshkar Discharged) आले होते. लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. नुकतंच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला (Lata Mangeshkar Discharged)  आहे. आज (8 डिसेंबर) पुन्हा त्या घरी परतल्या आहेत. नुकतंच याबाबतच ट्विट लता मंगेशकर यांनी केले (Lata Mangeshkar Discharged)  आहे.

“नमस्कार.. गेल्या 28 दिवसांपासून मी ब्रीच कँडी रुग्णालयात होती. मला न्यूमोनिया झाला होता. मी पूर्ण बरी झाल्यानंतरच घरी जावे असे डॉक्टरांचे म्हणणं होतं. त्यानंतर पूर्ण बरी होऊनच आज पुन्हा घरी आली आहे. देव, आई-बाबा यांचे आशीर्वाद, तुमच्या सर्वांचे प्रेम आणि प्रार्थना यामुळे मी आता बरी आहे. मी तुमच्या सर्वांची मनापासून आभार मानते,” असे ट्विट लता मंगेशकर यांनी केले आहे.

इतकंच नव्हे तर त्यांनी ट्विटरवरुन उपचार करणाऱ्या डॉक्टरच्या टीमचेही आभार मानले आहेत. “माझे ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टर खरोखर देव आहेत. रुग्णालयातील सर्व कर्मचारीही चांगले आहेत. मी तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानते. हे प्रेम आणि आशीर्वाद असेच कायम ठेवा,” असेही लता मंगेशकर यांनी म्हटलं (Lata Mangeshkar Discharged)  आहे.

दरम्यान लता मंगेशकर यांची 11 नोव्हेंबर रोजी अचानक तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यांच्यावर रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर फारुख उदवाडीया यांच्या देखरेखीत उपचार सुरु होते. यानंतर त्यांची तब्येत ढासळत असल्याचे मॅसेजही व्हायरल झाले. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी सर्वच स्तरावरुन प्रार्थना सुरु होत्या. पण त्यानंतर आज जवळपास 28 दिवसांनी त्यांच्या तब्येतीमध्ये चांगली सुधारणा झाली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *