AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beirut Blast | शक्तीशाली स्फोटात 220 जणांचा मृत्यू, लेबनानच्या पंतप्रधानांसह अख्ख्या मंत्रिमंडळाचा राजीनामा

लेबनानचे पंतप्रधान हसन दियाब यांनी राजधानी बेरुतमध्ये झालेल्या शक्तिशाली स्फोटानंतर मंत्रिमंडळासह सामूहिक राजीनामा दिला आहे (Lebanon PM resign after blast).

Beirut Blast | शक्तीशाली स्फोटात 220 जणांचा मृत्यू, लेबनानच्या पंतप्रधानांसह अख्ख्या मंत्रिमंडळाचा राजीनामा
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Aug 11, 2020 | 12:54 PM
Share

बेरुत : लेबनानचे पंतप्रधान हसन दियाब यांनी राजधानी बेरुतमध्ये झालेल्या शक्तिशाली स्फोटानंतर मंत्रिमंडळासह सामूहिक राजीनामा दिला आहे (Lebanon PM resign after blast). त्यांनी लेबनानाच्या राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर जनतेला संबोधित करत आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी एक पाऊल मागे येऊन लेबनानच्या नागरिकांसोबत बदलाच्या प्रक्रियेत सहभागी होत असल्याचंही नमूद केलं.

नुकताच लेबनानची राजधानी बेरुतमध्ये शक्तिशाली स्फोट झाला. या स्फोटाने जगाला हदरवलं. त्यात आतापर्यंत 220 लोकांचा मृत्यू झाला, तर अनेकजण गंभीर जखमी आहेत. हसन दियाब म्हणाले, “मी एक पाऊल मागे टाकत आहे. त्यामुळे मला लोकांसोबत त्यांच्या बदलाच्या लढाईत सहभागी होता येईल. मी आज या सरकारमधील माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. ईश्वर लेबनानला सुरक्षित ठेवो.”

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

बेरुतमधील स्फोटानंतर लेबनानच्या नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पाहायला मिळाला. नागरिकांनी याला सरकारचा बेजबाबदारपणा कारण मानून पंतप्रधानांसह मंत्रिमंडळाच्या राजीनाम्याची मागणी केली होती.सरकारवर अकार्यक्षम असल्याचाही आरोप झाला. त्याविरोधात लाखो लेबनन नागरिकांनी रस्त्यावर उतरुन सरकारचा जोरदार विरोध करण्यास सुरुवात केली.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

मागील काही काळात लेबनानवर ढासाळलेल्या अर्थव्यवस्थेचं मोठं संकट आलं होतं. त्यातच बेरुतमध्ये झालेल्या शक्तीशाली स्फोटानंतर हा जनतेतील असंतोष टोकाला गेला. लाखो नागरिक रस्त्यावर उतरुन पंतप्रधानांसह मंत्रिमंडळाच्या राजीनाम्याची मागणी करत होते. यातून लेबनान सरकारवर मोठा दबाव वाढला होता. त्यातूनच अखेर हे राजीनामा सत्र झालं.

संबंधित बातम्या :

Beirut Blast Video | लेबनानची राजधानी बेरुतमध्ये 15 मिनिटात दोन महाभयंकर स्फोट, हजारो जखमी

Lebanon PM resign after Beirut blast

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...