Beirut Blast Video | लेबनानची राजधानी बेरुतमध्ये 15 मिनिटात दोन महाभयंकर स्फोट, हजारो जखमी

लेबनानची राजधानी असलेले बेरुत शहर महाभयंकर स्फोटांमुळे (Huge Explosion Blast In Lebanon Capital Beirut) हादरलं. या स्फोटामुळे संपूर्ण शहराला हादरा बसला.

Beirut Blast Video | लेबनानची राजधानी बेरुतमध्ये 15 मिनिटात दोन महाभयंकर स्फोट, हजारो जखमी

बेरुत : लेबनानची राजधानी असलेले बेरुत शहर महाभयंकर स्फोटांमुळे हादरलं. बेरुत शहरात दोन महाभयंकर स्फोट झाले. यात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो लोक जखमी झाले आहेत. या स्फोटामुळे संपूर्ण शहराला हादरा बसला. हा स्फोट इतका भयंकर होता की गाड्यांच्या काचा, इमारतींच्या खिडक्यांचा अक्षरश: चक्काचूर झाला. हा स्फोट नेमका कसा झाला याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. (Huge Explosion Blast In Lebanon Capital Beirut)

लेबनान देशाची राजधानी असलेल्या बेरुत शहरात मंगळवारी (4 ऑगस्ट) दुपारच्या सुमारास मोठा आवाज झाला. हा आवाज कशामुळे झाला हे समजण्यापूर्वीच एक स्फोट झाला. त्यानंतर काही मिनिटानंतर दुसरा स्फोट झाला. जवळपास 15 मिनिटात एकमागोमाग एक दोन स्फोट झाले. याचा आवाज एखाद्या बॉम्बस्फोटप्रमाणे होता. या स्फोटामुळे जमिनीला तडे गेले. गगनचुंबी इमारती जमीनदोस्त झाल्या. अनेक इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या.

या महाभंयकर स्फोटामुळे शहरात अनेक ठिकाणी धूराचे साम्राज्य पसरलं होतं. या दुर्घटनेचे अनेक व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या स्फोटामुळे अनेक लोक जखमी झाले आहेत.

या घटनेनंतर राष्ट्रपती मायकल आऊन यांनी आपत्कालीन बैठक बोलवली आहे. या बैठकीत आरोग्यमंत्री हमाद हसन यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत अनेक लोक जखमी झाले आहेत. तसेच शहराचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शहरातील सर्व रुग्णालयांनी जखमींवर उपचार करण्यासाठी तयार रहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

बेरुतमधील भारतीय दुतावासाने स्थायिक भारतीयांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. कुणीही घाबरुन जाऊ नये, जर कुणाला मदत हवी असेल तर हेल्पलाइन नंबर देण्यात आले आहेत. शांत राहा असंही आवाहन करण्यात आलं आहे. (Huge Explosion Blast In Lebanon Capital Beirut)

संबंधित बातम्या : 

J-15 Jet | हवेतल्या हवेत इंधन भरण्याची क्षमता, चीनचं J15 फायटर प्लेन सज्ज

भारतात येण्याआधीच राफेलच्या कामगिरीची चर्चा, चीनसारख्या देशाला भीती का वाटते?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *