पुणे, ठाणे, नागपुरात कोरोनाचे रुग्ण वाढतेच, राज्यात कुठे किती नवे रुग्ण?

पुणे, औरंगाबाद, ठाणे, कोल्हापूर, नागपूर या ठिकाणी कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढताना दिसत (Maharashtra Corona Positive Patient) आहे. 

पुणे, ठाणे, नागपुरात कोरोनाचे रुग्ण वाढतेच, राज्यात कुठे किती नवे रुग्ण?
Follow us
| Updated on: Apr 11, 2020 | 3:19 PM

पुणे : राज्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला (Maharashtra Corona Positive Patient) आहे. आज (11 मार्च) राज्यात 92 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यात मुंबई, पुणे, औरंगाबाद, ठाणे, कोल्हापूर, नागपूर या ठिकाणी कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 1 हजार 666 वर पोहोचला आहे.

पुण्यात रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेल्या दाम्पत्याला (Maharashtra Corona Positive Patient)  कोरोनाची लागण झाली आहे. या दाम्पत्याच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर आता या दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. तर दुसरीकडे पुण्यात एका पोलीस कर्मचाऱ्याच्या आईला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पुण्यात तीन नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत.

तर औरंगाबादमध्ये आणखी दोघांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे औरंगाबादेमधील कोरोना रुग्णांची संख्या 20 वर पोहोचली आहे.

राज्यात कुठे किती रुग्णांची वाढ?

  • मुंबई – 72
  • औरंगाबाद – 2
  • मालेगाव – 5
  • पनवेल – 2
  • कल्याण – 1
  • ठाणे  – 4
  • पालघर – 1
  • नाशिक – 2
  • अहमदनगर – 1
  • पुणे – 3
  • वसई विरार – 1
  • नागपूर – 2
  • कोल्हापूर – 1

ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये कोरोनाचे तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यात पोलिसाची पत्नी आणि मुलगी यांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्वजण लॉकडाऊनदरम्यान साताऱ्यात एका नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी गेले होते. याठिकाणी ते सर्व पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले. तर एका रुग्णालयात काम करणाऱ्या आणि बदलापूरमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. या तिघांना बदलापूरच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

कोल्हापूर, नागपुरात कोरोनाचे रुग्ण वाढले

तर कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईक महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोल्हापुरात आज (11 एप्रिल) महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

त्याशिवाय नागपुरात आणखी दोन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यातील एक रुग्ण हा सतरंजीपुरा भागातील मृत्यू झालेल्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील आहे. तर दुसरा रुग्ण हा चंद्रपूर येथील रुग्णाच्या संपर्कातील आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या एकूण सात जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे नागपुरातील कोरोनाबाधितांचा आकडा  27 वर गेला आहे.

राज्यातील रुग्णांची अपडेट आकडेवारी

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861
Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.