भाजपच्या विजय संकल्प बाईक रॅलीमध्ये मंत्र्यांची घोडेस्वारी

जालना : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी भाजपकडून विधानसभा स्तरावर विजय संकल्प बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं. राज्यातील विविध भागांमध्ये भाजपचे नेते बाईकस्वारी करताना दिसून आले. यातच राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकरांनी बाईक नाही तर चक्क घोडेस्वारी केली. यावेळी घोडेस्वारी करताना त्यांनी मोदींच्या नावाने घोषणाही दिल्या. ‘हर हर मोदी, घर घर मोदी’ अशा […]

भाजपच्या विजय संकल्प बाईक रॅलीमध्ये मंत्र्यांची घोडेस्वारी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

जालना : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी भाजपकडून विधानसभा स्तरावर विजय संकल्प बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं. राज्यातील विविध भागांमध्ये भाजपचे नेते बाईकस्वारी करताना दिसून आले. यातच राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकरांनी बाईक नाही तर चक्क घोडेस्वारी केली. यावेळी घोडेस्वारी करताना त्यांनी मोदींच्या नावाने घोषणाही दिल्या. ‘हर हर मोदी, घर घर मोदी’ अशा घोषणा देत लोणीकरांनी घोडेस्वारी केली.

मुख्यमंत्र्यांनी स्वत: बाईक चालवली :

भाजपने आज आपलं शक्ती प्रदर्शन करत विजय संकल्प बाईक रॅलीचं आयोजन केलं. यामध्ये मुंबई, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, हिंगोलीसह इतर शहरांमध्ये या बाईक रॅली काढण्यात आल्या. मुंबईमधील वांद्रे-वरळी सी लिंक टोल नाका ते वाकोलापर्यंत ही बाईक रॅला काढण्यात आली. यावेळी स्वत: मुख्यमंत्र्यांनी बाईक चालवली. मुख्यमत्र्यांसोबत मुंबई भाजप अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

नाशिक बाईक रॅलीत मोदींच्या नावाच्या घोषणा :

नाशिक विधानसभा मतदार संघात नाशिकच्या एनडी पटेल रोड येथील भाजपच्या वसंत स्म्रुती कार्यालय येथून बाईक रॅली काढण्यात आली, या रॅलीमध्ये नाशिक विधानसभा मतदार संघातील सर्व भाजप नगरसेवक, पुरुष आणि महिला पदाधिकारी, आघाड्यांचे प्रमुख, सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने संख्येने सहभागी झाले. यावेळी ‘देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो’, अशा घोषणाही देण्यात आल्या.

कोल्हापूरमध्येही बाईक रॅलीचा उत्साह :

कोल्हापूर उत्तर मतदार संघातील मुख्य मार्गावरुनही भाजपने ही बाईक रॅली काढली. यामध्ये भाजपच्या पुरुष कार्यकर्त्यांसोबतच महिला कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांच्यासह अनेक पदाधिकारी या रॅलीत सहभागी झाले. तर हिंगोलित या बाईक रॅलीमध्ये आमदार तान्हाजी मुटकुले, नगर अध्यक्ष बाबारावजी बांगर यांच्यासह अनेक मान्यवरांनी सहभाग दर्शवला.

अवघं नागपूर भाजपमय झालं : 

नागपुरातही वेगवेगळ्या मतदार संघात पाच बाईक रॅली काढत भाजपने शक्ती प्रदर्शन केलं. नागपूरच्या संविधान चौकातून एका रॅलीला सुरवात झाली, तर इतर प्रत्येक आमदाराच्या मतदार संघात रॅली काढण्यात आली. यात युवा मोर्चाचा मोठा पुढाकार होता. यामध्ये मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. शहराच्या विविध भागात या रॅली निघाल्या असल्याने जिकडे तिकडे भाजपचे झेंडे पाहायला मिळत होते.

Non Stop LIVE Update
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात.