AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विजेचं कनेक्शन कापायला आले तर शॉक देणार, मनसेचा राज्य सरकारला इशारा

राज्यात ठिकठिकाणी मनसेकडून 'झटका मोर्चा'च्या माध्यमातून वाढीव वीजबिल माफ करण्याची मागणी करण्यात येत आहे. (MNS increased electricity bill)

विजेचं कनेक्शन कापायला आले तर शॉक देणार, मनसेचा राज्य सरकारला इशारा
| Updated on: Nov 26, 2020 | 3:49 PM
Share

मुंबई : वाढीव वीजबिलाविरोधात मनसेने (MNS) राज्यव्यापी आंदोलन छेडले आहे. राज्यात ठिकठिकाणी मनसेकडून ‘झटका मोर्चा’च्या माध्यमातून वाढीव वीजबिल माफ करण्याची मागणी करण्यात येत आहे. यावेळी वांद्रे येथे जिल्हाधिकारी कार्यलयावर मोर्चा काढण्यात आला. (MNS march against increased electricity bill)

या मोर्चात मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांकडून राज्य सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. तसेच, नागरिकांचे वाढीव वीजबिल माफ करण्याची मागणी करण्यात आली.

वीज दरवाढीसंदर्भाबाबत यापूर्वी मनसेने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यावेळी मनसेने वीज दरवाढ कमी करण्यासंदर्भात राज्यपालांना निवेदन दिलं होत. त्यानंतर मनसेने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. यावेळी, राज्य सरकार वीजबिलाच्या प्रश्नावर गंभीर असल्याचं दिसत नाही, असा आरोप मनसेने केला. याच कारणामुळे मनसेतर्फे वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला हा अंतिम इशारा असल्याचे मनसेकडून सांगण्यात आले.

… तर शॉक देणार

तसेच, यापुढे आता वीज ग्राहक वाढीव वीजबिल भरणार नाही. बील भरले नाही म्हणून जर एमएसईबी आणि वीज कंपनीचे अधिकारी कनेक्शन कापायला आले, तर त्यांना शॉक देणार, असा इशारा मनसेच्या नेत्यांनी यावेळी दिला.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. मात्र, मोर्चा काढण्यावर मनसे नेते ठाम असल्याने वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते. या मोर्चामध्ये कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही. हा मोर्चा शांतपणे पार पडला. यावेळी मनसेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. यावेळी नागरिकांना वीजबिलाबाबत तत्काळ दिलासा द्यावा अशी मागणी मनसेने केली.

तसेच, जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आगामी काळातही आमची मोर्चाची तयारी आहे. मनसेला नोटीस पाठवा किंवा कार्यकर्त्यांची धरपकड करा आम्ही घाबरत नाही, असा इशाराही मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सरकारला दिला. (MNS march against increased electricity bill)

संबंधित बातम्या :

पुण्यात पंतप्रधान मोदींचा मार्ग अडवणार, मराठा क्रांती ठोक मोर्चाचा एल्गार

MNS Morcha Against Electricity Bill ! राज्यभरात मनसेचा आंदोलनाचा ‘झटका’; मुंबईत विराट मोर्चा, तर ठाण्यात पोलीस-मनसे कार्यकर्त्यांत बाचाबाची

‘कितीही दबावतंत्र वापरले तरी ‘झटका मोर्चा’ होणारच’ मनसे भूमिकेवर ठाम

दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.