UAE कडून मोदींना अनोख्या शुभेच्छा

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याने संयुक्त अरब अमीरात (UAE) ने मोदींना हटके पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. जेव्हा नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवन येथे पद आणि गोपनियतेची शपथ घेत होते, तेव्हा अबू धाबीमध्ये त्याचवेळी एका उंच इमारतीवर त्यांचा फोटो एलईडीमार्फत लावण्यात आला होता. अबू धाबी नॅशनल ऑईल कंपनीच्या (ADNOC) टॉवरवर भारत आणि UAE देशाचा […]

UAE कडून मोदींना अनोख्या शुभेच्छा
Follow us
| Updated on: May 31, 2019 | 12:28 PM

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याने संयुक्त अरब अमीरात (UAE) ने मोदींना हटके पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. जेव्हा नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवन येथे पद आणि गोपनियतेची शपथ घेत होते, तेव्हा अबू धाबीमध्ये त्याचवेळी एका उंच इमारतीवर त्यांचा फोटो एलईडीमार्फत लावण्यात आला होता.

अबू धाबी नॅशनल ऑईल कंपनीच्या (ADNOC) टॉवरवर भारत आणि UAE देशाचा राष्ट्रध्वज प्रदर्शित करण्यात आला. तसेच UAE चे युवराज शेख मोहम्मद बिन जायद अल नहयान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओही लावला जात होता. UAE मधील हा व्हिडीओ भारताच्या राजदुतांनी शेअर केला आहे.

भारत आणि UAE मध्ये उर्जा क्षेत्रात सर्वात मोठी गुंतवणूक केली आहे. ADNOC ही एकटी अशी कंपनी आहे तिने भारताच्या पेट्रोलियम रिजर्व्ह प्रोग्राममध्ये गुंतवणूक केले आहे. या कंपनीने महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये तयार होणाऱ्या सर्वात मोठ्या रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल कॉम्पलेक्समधील प्रोजेक्टमध्येही भागीदारी केली आहे.

नेरंद्र मोदींनी सलग दुसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मोदी पहिल्यांदा 2014 रोजी देशाचे पंतप्रधान झाले होते.

पंतप्रधान म्हणून आपला एक कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा पंतप्रधान होणारे नरेंद्र मोदी हे तीसरे पंतप्रधान आहेत. यापूर्वी एक कार्यकाल पूर्ण झाल्यावर दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरु आणि डॉ. मनमोहन सिंह पंतप्रधान झाले आहेत.

पंतप्रधानांसोबत 57 खासदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये 24 कॅबिनेट मंत्री, 9 राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार आणि 24 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.