पडद्यामागे जोरदार हालचाली, भाजपची मोठी खेळी, मविआला जबरदस्त झटका बसणार?

महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे जोरदार हालाचाली घडत आहेत. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता थेट राजकीय मैदानात उतरताना दिसत आहेत. त्यामुळे शरद पवार गटासह महाविकास आघाडीला आता त्यांच्या रणनीतीचा मोठा फटका बसणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

पडद्यामागे जोरदार हालचाली, भाजपची मोठी खेळी, मविआला जबरदस्त झटका बसणार?
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांचे फोटो
Follow us
| Updated on: Apr 28, 2024 | 6:40 PM

माढा लोकसभा मतदारसंघातील घडामोडी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी या मतदारसंघात भाजपचे धैर्यशील मोहिते पाटील यांना आपल्याकडे वळवत त्यांना उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपचं वैयक्तिक मोठं नुकसान होण्याचा अंदाज वर्तवला जात होता. पण भाजपने त्यापेक्षाही मोठा डाव खेळला आहे. कारण शरद पवार यांच्या अतिशय जवळचे मानले जाणारे नेते अभिजीत पाटील हे भाजपच्या वाटेवर आहेत. अभिजीत पाटील यांचं सोलापुरात चांगलं वर्चस्व आहे. त्यांनी भाजपात प्रवेश केला तर महाविकास आघाडीच्या सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे आणि माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील या दोन्ही उमेदवारांना फटका बसण्याची शक्यता आहे. कारण अभिजीत पाटील यांची पंढरपूर तालुक्यात ताकद आहे. या तालुक्यातील दीड लाख मतदान हे माढ्यात आहे, तर अडीच लाख मतदान हे सोलापूर लोकसभेत आहे. त्यामुळे शरद पवार गट आणि महाविकास आघाडीसाठी हा मोठा झटका असणार आहे.

विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्वत: याबाबत मोठा दावा केला आहे. माढ्यात महायुतीकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न सुरु आहे. शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे नेते अभिजीत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येत आहे. खुद्द जयंत पाटील यांनीदेखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अभिजीत पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल. एक एक मत आपल्या बाजूने करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

“विठ्ठल सहकारी साखर कारखाना स्वर्गीय अण्णांच्या छत्रछायेखाली अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू होता. मधल्या काळात संकटात आला. तुम्ही सगळ्यांनी अभिजीत पाटील यांच्या पॅनलला निवडून दिलं. त्यांनीही त्यासाठी चांगले परिश्रम घेतले. पण आता अभिजीत पाटलांनाच ताब्यात घेण्याचा प्रकार चालला आहे. विठ्ठल कारखाना सील करणे म्हणजे विठ्ठलालाच सील करण्याचे सरकारचे धाडस आहे. अभिजीत पाटील यांच्या पॅनलला तुम्ही निवडून दिले तेव्हा त्यांनी कारखान्याचे काम चांगले चालवले. आता त्यांनाच ताब्यात घेण्याचा प्रकार सुरू आहे. माहिती मिळत आहे की, ते एक दोन दिवसात भाजपमध्ये प्रवेश करतील”, असं जयंत पाटील म्हणाले आहेत. दुसरीकडे मोहिते पाटील कुटुंबातील धवलसिंह मोहिते पाटील हे भाजपसोबत जाणार असल्याची देखील चर्चा आहे. त्यामुळे माढ्यात काय-काय होतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अभिजीत पाटील आणि फडणवीसांची आज भेट होणार?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस आज सोलापुरात मुक्कामी आहेत. या दरम्यान त्यांची अभिजीत पाटील यांच्यासोबत बैठक पार पडणार आहे. अभिजीत पाटील यांच्या कारखान्यावर शिखर बँकेकडून दोन दिवसांपूर्वीच कारवाई झाली आहे. या कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. कारखान्याच्या सर्व संचालकांनी कुठल्याही परिस्थितीत कारखाना वाचवायचा, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे अभिजीत पाटील देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. अभिजीत पाटील यांची माढा आणि सोलापूर दोन्ही ठिकाणी मोठी ताकद आहे. पंढरपूर पासून अक्कलकोटपर्यंत सर्व ठिकाणी अभिजीत पाटील यांचं नेटवर्क तयार झालं आहे. देवेंद्र फडणवीस आणि अभिजीत पाटील यांची आज सोलापुरात भेट होणार असल्याचीदेखील माहिती मिळत आहे.

Non Stop LIVE Update
आणि नरेंद्र मोदी मंचावर येऊन रडतात, प्रियंका गांधी यांचा हल्लाबोल
आणि नरेंद्र मोदी मंचावर येऊन रडतात, प्रियंका गांधी यांचा हल्लाबोल.
अजित दादांवरच्या 'त्या' आरोपांवर देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण
अजित दादांवरच्या 'त्या' आरोपांवर देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण.
कौल कुणाला? दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, बीड-शिरूर कोण राखणार?
कौल कुणाला? दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, बीड-शिरूर कोण राखणार?.
पवारांच्या वक्तव्यावर शशी थरूर म्हणाले,तर रेड कार्पेट टाकून स्वागत करू
पवारांच्या वक्तव्यावर शशी थरूर म्हणाले,तर रेड कार्पेट टाकून स्वागत करू.
मोदींच्या गुलामांच्या फौजेत आणखी एक भर, राज ठाकरेंवर कुणाचा निशाणा?
मोदींच्या गुलामांच्या फौजेत आणखी एक भर, राज ठाकरेंवर कुणाचा निशाणा?.
'राज ठाकरे बाळासाहेबांचे प्रतिरूप, त्यांना धनुष्यबाणाच्या मंचावर....'
'राज ठाकरे बाळासाहेबांचे प्रतिरूप, त्यांना धनुष्यबाणाच्या मंचावर....'.
फडणवीस राजकारणातलं कच्चं मडकं, ठाकरे गटातील बड्या नेत्याचा घणाघात
फडणवीस राजकारणातलं कच्चं मडकं, ठाकरे गटातील बड्या नेत्याचा घणाघात.
पवारांनी माझा राजीनामा मागितला...खडसे भाजपात येण्यापूर्वी काय म्हणाले?
पवारांनी माझा राजीनामा मागितला...खडसे भाजपात येण्यापूर्वी काय म्हणाले?.
ठाकरेंना 1999 पासूनच मुख्यमंत्रिपदाची स्वप्न, पण...फडणवीसांचा हल्लाबोल
ठाकरेंना 1999 पासूनच मुख्यमंत्रिपदाची स्वप्न, पण...फडणवीसांचा हल्लाबोल.
११ महिन्यांच्या चिमुकल्यासह महिला कर्मचारी निवडणुकीच्या ड्युटीवर
११ महिन्यांच्या चिमुकल्यासह महिला कर्मचारी निवडणुकीच्या ड्युटीवर.