AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपुरात वाढत्या ‘कोरोना’ रुग्णसंख्येला महापालिका प्रशासन जबाबदार, महापौरांचा आरोप

जर कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आणखी वाढला, तर याला सर्वस्वी महापालिका प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही महापौर संदीप जोशी यांनी दिला आहे. (Nagpur Mayor Sandeep Joshi on Tukaram Mundhe)

नागपुरात वाढत्या 'कोरोना' रुग्णसंख्येला महापालिका प्रशासन जबाबदार, महापौरांचा आरोप
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Apr 21, 2020 | 3:33 PM
Share

नागपूर : नागपुरात ‘कोरोना’बधित रुग्णांचा आकडा दररोज वाढताना दिसत आहे. यासाठी महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी केला आहे. ‘कोरोना’च्या संकटकाळात महापौरांनी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे अंगुलीनिर्देश केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (Nagpur Mayor Sandeep Joshi on Tukaram Mundhe)

‘नागपूरच्या आमदार निवास आणि इतर ठिकाणी कोरोना संशयितांना एकत्र क्वारंटाइन करुन ठेवलं जात आहे. यातील अनेक जण एकत्रितपणे वावरत आहेत. ज्यावेळी तपासणी अहवाल येतो, त्यावेळी यातील काहींचा अहवाल पॉझिटिव्ह येतो. मात्र तोपर्यंत त्यांनी इतरांनाही संसर्ग केलेला असतो’ असा दावा महापौर संदीप जोशी यांनी केला आहे.

आधी तपासणी करुन जे रुग्ण ‘कोरोना’ पॉझिटिव्ह येत आहेत, त्यांच्यावर उपचार करावेत, आणि जे निगेटिव्ह येत आहेत त्यांना क्वारंटाइन करुन ठेवावं. हे करताना ज्यांना अधिक लक्षणं आहेत, त्यांना लाल आणि ज्यांना लक्षणं नाही त्यांना हिरवा टॅग लावा’ असंही नागपूरच्या महापौरांनी सुचवलं आहे.

जर कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आणखी वाढला, तर याला सर्वस्वी महापालिका प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही महापौर यांनी दिला आहे. (Nagpur Mayor Sandeep Joshi on Tukaram Mundhe)

हेही वाचा : हिरमुसलेल्या तरुणाला नागपूर पोलिसांचं सरप्राईज, बर्थडे केक घरपोच

नागपूर शहरात आणखी एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने आजच्या दिवसात सापडलेल्या रुग्णांची संख्या आठवर गेली आहे. नागपुरातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 89 झाली आहे.

चार रुग्णांना रविभवन शासकीय निवासस्थान, तर चौघा रुग्णांना वनामती येथे क्वारंटाइन करुन ठेवले होते. गेल्या 20 दिवसात नागपूर शहरात 72 रुग्ण वाढले आहेत. विशेष म्हणजे ‘कोरोना’मुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णाच्या संपर्कातील किमान 37 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

संबंधित बातमी :

नागपुरातील ‘त्या’ कोरोनाग्रस्त मृताच्या संपर्कातील 37 जण पॉझिटिव्ह

(Nagpur Mayor Sandeep Joshi on Tukaram Mundhe)

Follow Us
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...