नागपुरातील ‘त्या’ कोरोनाग्रस्त मृताच्या संपर्कातील 37 जण पॉझिटिव्ह

नागपुरातील 'त्या' कोरोनाग्रस्त मृताच्या संपर्कातील 37 जण पॉझिटिव्ह

नागपुरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढली आहे. नऊ जणांचे 'कोरोना' रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आले आहेत. (Nagpur Dead Corona Patient 37 Contacts Covid 19 Positive)

अनिश बेंद्रे

|

Apr 19, 2020 | 7:02 PM

नागपूर : नागपुरात ‘कोरोना’मुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णाच्या संपर्कातील तब्बल 37 जण ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आढळले आहेत. या वाढलेल्या आकड्यांमुळे ‘कोविड 19’ ची भयावहता अधोरेखित होत आहे. नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी आपली माहिती पालिकेला कळवण्याचं आवाहन केलं आहे. (Nagpur Dead Corona Patient 37 Contacts Covid 19 Positive)

नागपुरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढली आहे. नऊ जणांचे ‘कोरोना’ रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आले आहेत. यापैकी आठ सतरंजीपुरामध्ये मृत्युमुखी पडलेल्या ‘कोरोना’बाधित रुग्णाच्या संपर्कातील आहेत.

नागपुरातील सतरंजीपुरामधील कोरोनाग्रस्त रुग्णाचा पाच एप्रिलला मृत्यू झाला होता. आतापर्यंत त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 37 जणांचे ‘कोरोना’ रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. म्हणजेच एका व्यक्तीच्या संपर्कात आल्याने नागपुरातील 37 रुग्ण वाढले.

हेही वाचा : Corona : मालेगाव ‘कोरोना’ हॉटस्पॉट कसं बनलं?

चिंतेची गोष्ट, म्हणजे या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या आणखी 144 जणांच्या रिपोर्टची प्रतिक्षा आहे. त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कुणी त्या रुग्णाच्या संपर्कात आले असल्यास, त्यांनी आपली माहिती लपवू नये, महापालिकेला कळवावी, असं आवाहन पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलं आहे.

तुकाराम मुंढे यांनी कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यास मृतदेहाच्या अंत्यविधीबाबत कठोर नियमावली जारी केली आहे. कोरोनाग्रस्त मृतदेहांच्या अंत्यसंस्काराच्यावेळी या मार्गदर्शक तत्त्वांचं कठोर पालन करण्याचे निर्देश मुंढे यांनी दिले आहेत.

कोरोना रुग्णाच्या अंत्यसंस्काराची नियमावली काय? 

1. मृतदेहाला कुणीही स्पर्श करु नये. 2. मृतदेहावर अंत्यविधी करताना पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी उपस्थित राहू नये. 3. रुग्णालय प्रशासनाने कोरोनाग्रस्त रुग्णाच्या मृत्यूची माहिती आधी संबंधित पोलिस स्टेशनला द्यावी. 4. मृतदेहाला कुणी स्पर्श करणार नाही आणि अंत्यविधीला पाचपेक्षा जास्त लोक उपस्थित राहणार नाहीत, याची खातरजमा झाल्यानंतरच मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द करणे. 5. अंत्यविधी करण्यात येणारे घाट किंवा स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी मास्क, ग्लोव्ह आणि अन्य सुरक्षा साहित्यांचा वापर करणे अत्यावश्यक आहे

(Nagpur Dead Corona Patient 37 Contacts Covid 19 Positive)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें