Bharat Bhalke Funeral live : भारत भालके यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, मुलाकडून भडाग्नी

आमदार भारत भालके (Bharat Bhalke Funeral live) यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार.

Bharat Bhalke Funeral live : भारत भालके यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, मुलाकडून भडाग्नी
Follow us
| Updated on: Nov 28, 2020 | 5:20 PM

पुणे/पंढरपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत भालके (Bharat Bhalke Funeral live) हे अनंतात विलीन झाले आहेत. आमदार भालके यांच्या पार्थिवावर सोलापूर जिल्ह्यातील मूळगाव सरकोली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा भागीरथी भालके यांनी वडिलांच्या चितेला भडाग्नी दिला.

आमदार भारत भालके यांच्या अंत्यविधीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दत्ता भरणे, काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह पंचक्रोशीतील कार्यकर्ते उपस्थित होते.

पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेले भारत भालके (Bharat Bhalke death) यांचे शुक्रवारी मध्यरात्री पुण्यातील रुबी हॉल (ruby hall clinic) रुग्णालयात निधन झालं. भारत भालके यांनी कोरोनावर मात केली होती. मात्र पुन्हा त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र शुक्रवारी रात्री 12.30 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. (NCP MLA Bharat Bhalke Funeral live update)

भारत भालके यांचं पार्थिव सकाळी पुण्यावरुन पंढरपूरकडे रवाना झालं. पंढरपुरातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर पार्थिव दाखल झाल्यानंतर, तिथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं. त्यानंतर पार्थिव भालकेंचं मूळगाव सरकोली इथे नेण्यात आलं. दरम्यान, आमदार भारत भालके यांच्या अंत्यदर्शनासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सुद्धा जाणार होते. मात्र खराब हवामानामुळे त्यांना हेलिकॉप्टरचा प्रवास टाळावा लागला.

 Bharat Bhalke LIVE UPDATE

[svt-event title=”सरकार भारतनानाच्या मतदारसंघाच्या पाठीशी : अजित पवार” date=”28/11/2020,4:44PM” class=”svt-cd-green” ] भारत नानांना इतक्या लवकर अखेरचा निरोप असं कधीच वाटलं नव्हतं. पवारसाहेब सुद्धा येणार होते मात्र खराब हवामानामुळे येऊ शकले नाहीत. नाना जनतेशी नाळ जोडलेला नेता. गोर गरिबांमध्ये समरस होणाऱ्या राज्यतील नेत्यापैकी नाना होते. कोरोनालासुद्धा नानांनी धोबी पझाड केलं. महाविकास आघाडीला आज एक वर्ष पूर्ण होत असताना भरभक्कम पाठिंबा देणारा एक आधार गेला. सरकार या मतदारसंघाच्या पाठीशी राहिल. कोरोनाच्या काळात जिवाभावाची माणसं गेली आहेत…तुम्ही आता काळजी घ्या : अजित पवार यांचं आवाहन [/svt-event]

[svt-event title=”भारत भालके यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार,” date=”28/11/2020,4:07PM” class=”svt-cd-green” ] भारत भालके यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दत्ता भरणे, आमदार प्रणिती शिंदे उपस्थित [/svt-event]

[svt-event title=”भारत भालकेंच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी” date=”28/11/2020,1:50PM” class=”svt-cd-green” ] आमदार भारत भालके यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी घराबाहेर ठेवलं, अंत्यदर्शनासाठी पंचक्रोशीतील नागरिकांची गर्दी [/svt-event]

मध्यरात्री झुंज अपयशी

राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके (MLA Bharat Bhalke died at ruby hall clinic) यांचे शुक्रवारी मध्यरात्री पुण्यात निधन झाले. ते 60 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि तीन विवाहित मुली असा परिवार आहे. सकाळी पंढरपूरच्या सरकोली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. (MLA Bharat Bhalke Passed Away in Pune)

(NCP MLA Bharat Bhalke Funeral live update)

संबंधित बातम्या :   

कार्यकुशल आणि लोकाभिमुख नेतृत्व हरपले, आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर शरद पवार हळहळले 

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे निधन    

Bharat Bhalke | हॅटट्रिक आमदार ते जनसामान्यांचा नेता, भारत भालके यांची कारकीर्द  

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.