थंडीने दिल्ली गारठली, सहा राज्यांमध्ये रेड अलर्ट

दिल्लीमध्ये शनिवार हा या वर्षीचा आतापर्यंतचा सर्वाधिक थंड दिवस ठरला. दिल्लीमध्ये शनिवारी तापमान 2.4 अंश सेल्सिअस पर्यंत घसरलं, जे सामान्यपेक्षा 5 अंशाने कमी होतं.

थंडीने दिल्ली गारठली, सहा राज्यांमध्ये रेड अलर्ट
Follow us
| Updated on: Dec 29, 2019 | 9:13 AM

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीसोबतच उत्तर भारतात (North India Winter) सध्या हुडहुडी भरवणारी थंडी पडत आहे. दिल्लीमध्येतर थंडीने 22 वर्षांचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे (Record Break Winter). दिल्लीतील अनेक भागांमध्ये पारा 1.7 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला. डिसेंबर महिन्यात पारा 20 अंश सेल्सिअसपर्यंत घसण्याची ही चौथी वेळ आहे. गेल्या 100 वर्षांत केवळ चारवेळा पारा इतका खाली घसरला आहे. तापमानात घसरण होत असल्याने हवामान विभागाने दिल्लीसह सहा राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे (Red Alert In Delhi).

या गोठवणाऱ्या थंडीपासून 31 डिसेंबरनंतर थोड्या प्रमाणात आराम मिळेल, असाही अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर दुसरीकडे, नववर्षात म्हणजेच 1 किंवा 2 जानेवारीला गारपीटीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे (Delhi Weather Report).

शनिवार सर्वात थंड दिवस

दिल्लीमध्ये शनिवार हा या वर्षीचा आतापर्यंतचा सर्वाधिक थंड दिवस ठरला. दिल्लीमध्ये शनिवारी तापमान 2.4 अंश सेल्सिअस पर्यंत घसरलं, जे सामान्यपेक्षा 5 अंशाने कमी होतं. दिवसाच नाही तर शनिवारी रात्रीही रेकॉर्डब्रेक थंडी पडली. शनिवारी दिल्लीने गेल्या सहा वर्षांतील सर्वात थंडी रात्र पाहिली. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (29 डिसेंबर) पारा आणखी घसरु शकतो.

1997 नंतर पहिल्यांदा सलग 11व्या दिवशी गोठवणारी थंडी

थंडीने दिल्लीत नवा रेकॉ़र्ड बनवला आहे. 1997 नंतर पहिल्यांदा राजधानीत सलग 11 व्या दिवशी रेकॉर्डब्रेक थंडी पडली. स्कायमेटनुसार, डिसेंबरच्या सुरुवातीपासूनच दिल्ली-एनसीआरमध्ये गोठवणारी थंडी पडत आहे. भीषण थंडीला पाहता हवामान विभागाने दिल्लीसह सहा राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. यामध्ये पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांचा समावेश आहे. हवामानाची स्थिती अत्यंत वाईट असते, तेव्हा रेड अलर्ट जारी केला जातो.

थंडीचा वाहतुकीवरही मोठा परिणाम

दिल्लीतील थंडी आणि धुक्याचा परिणाम हवाई वाहतुकीवरही पाहायला मिळत आहे. राजधीनीत धुक्यामुळे शनिवारी 150 पेक्षा जास्त विमानांचं उशिराने उड्डाण झालं. तर दोन विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आलं. तर दहापेक्षा जास्त विमानं ही दिल्ली विमानतळावर लँड होऊ शकली नाही. विमानांच्या उड्डाणावरच नाही तर रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरही मोठा परिणाम जाणवला. शनिवारी दिल्लीहून निघणारी आणि दिल्लीवरुन जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या उशिराने धावत होत्या. तर दिल्ली आणि आसपासच्या परिसरात दृष्यमानता शून्य़ावर पोहोचली.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.