राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह कमेंट, करमाळ्याच्या तरुणाला मनसैनिकांकडून शिक्षा

| Updated on: Jul 05, 2019 | 4:44 PM

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या तरुणाला, मनसैनिकांनी शिक्षा केली. या तरुणाला मनसैनिकांनी 50 उठाबशा काढायला लावून त्याचा व्हिडीओ व्हायरल केला. यापुढे राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं तर याद राख असा दमही या तरुणाला दिला. संबंधित तरुण तो मूळचा सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील केडगावचा रहिवासी आहे. तो सध्या पुण्यात शिक्षण […]

राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह कमेंट, करमाळ्याच्या तरुणाला मनसैनिकांकडून शिक्षा
Follow us on

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या तरुणाला, मनसैनिकांनी शिक्षा केली. या तरुणाला मनसैनिकांनी 50 उठाबशा काढायला लावून त्याचा व्हिडीओ व्हायरल केला. यापुढे राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं तर याद राख असा दमही या तरुणाला दिला. संबंधित तरुण तो मूळचा सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील केडगावचा रहिवासी आहे. तो सध्या पुण्यात शिक्षण घेत असून पुण्यातच राहतो.

या तरुणाने राज ठाकरे यांच्या फेसबुक पेजवर आक्षेपार्ह कमेंट केली होती. त्यामुळे मनसे कार्यकर्ते चांगलेच चिडले होते. मनसे कार्यकर्त्यांनी या तरुणाला सोशल मीडियावरुन प्रत्यक्षात शोधून काढला आणि उशाबशा काढण्याची शिक्षा दिली.

मनसैनिकांनी या तरुणाला जाहीर माफी मागायला लावून, पुन्हा आक्षेपार्ह कमेंट न करण्याचा दम दिला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोलापूरसह पुण्यात व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओत काय म्हटलंय?

माझं नाव…..  मी राज साहेबांच्या चित्रावर कमेंट टाकली होती, जी टाकायला नको हवी होती. माझ्याकडून चूक झाली. मी तमाम मनसे सैनिक आणि राज साहेबांची माफी मागतो.

मनसैनिक काय म्हणतात – हा फक्त मराठी मुलगा, हा तरुण गरीब घरातला आहे, त्याचे वडील वारले आहेत. त्याला केवळ उठाबशा काढण्याची शिक्षा देतोय. हे फक्त पुण्यात झालंय, यापुढे महाराष्ट्रात कुठेही राजसाहेबांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं, तर त्याला शिक्षा देणारच.

VIDEO: