सावधान! मॉन्स्टरवरुन नोकरीच्या आमिषाने तरुणाला लुटलं

मुंबई : परदेशात जॉब देतो असे सांगून तरुणांना फसवाणाऱ्या एका इसमाला पायधुनी पोलिसांनी अटक केली आहे. परदेशात फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मॅनेजरची नोकरी देतो असे सांगत, तरुणांकडून लाखो रुपये उकळले जात होते. पायधुनी पोलिस याचा अधिक तपास करत आहेत. शम्स पठाण हा तरुण उच्च शिक्षीत आहे. त्यासोबतच त्याने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्सही केला आहे. तसेच त्याने काही […]

सावधान! मॉन्स्टरवरुन नोकरीच्या आमिषाने तरुणाला लुटलं
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM

मुंबई : परदेशात जॉब देतो असे सांगून तरुणांना फसवाणाऱ्या एका इसमाला पायधुनी पोलिसांनी अटक केली आहे. परदेशात फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मॅनेजरची नोकरी देतो असे सांगत, तरुणांकडून लाखो रुपये उकळले जात होते. पायधुनी पोलिस याचा अधिक तपास करत आहेत.

शम्स पठाण हा तरुण उच्च शिक्षीत आहे. त्यासोबतच त्याने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्सही केला आहे. तसेच त्याने काही वर्ष दुबईमध्ये एका हॉटेलमध्ये काम केले आहे. पण पठाण त्या नोकरीने खुश नसल्याने त्याला परदेशात चांगल्या पगाराची नोकरी हवी होती. यामुळे त्याने आपला बायोडेटा मॉन्स्टर (Monster.com) या वेबसाईटवर अपलोड केला. दुसऱ्या दिवशी पठाणला कॉल आला आणि ऑनलाईन पद्धतीने मुलाखतही झाली.

यानंतर या भामट्या टोळींनी पठाणला जे डब्ल्यू मॅरियट हॉटेलचं अपॉईंटमेंट लेटर सुद्धा मेल केलं. मात्र प्रत्येकवेळी परीक्षा आणि मेडिकल टेस्टच्या नावे पैसे पाठवण्यास सांगत राहिले. काही कालांतराने त्यांची मागणी वाढू लागल्याने पठाण याने हॉटेलच्या एच. आर. डिपार्टमेंटला संपर्क साधला तेव्हा पठाणला कळाले की, ज्या पोस्टसाठी त्याच्याकडून पैसे आकारले जात आहे अशी कोणतीही पोस्ट हॉटेलमध्ये नाही.

आपल्यासोबत फसवणूक झाल्याचे पठाणला कळ्यानंतर त्याने थेट पायधुनी पोलीस स्टेशन गाठलं आणि अज्ञात व्यक्तिविरोधात तक्रार दाखल केली. पायधुनी पोलिसांनी आयटी अॅक्टद्वारे गुन्हा नोंद करुन अधिक तपास सुरु केला आहे.

तुमच्यासोबतही अशी घटना घडू शकते. यासाठी ऑनलाईन नोकरी वेबसाईटवरुन जर पैशांची मागणी केली तर सावधना, चुकूनही असे पैसे ट्रान्सफर करु नका.

Non Stop LIVE Update
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.