AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिर्डीत वीज कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

कोणी वीज कापण्यासाठी आलं तर त्याच्या कानाखाली शॉक काढू. | MNS

शिर्डीत वीज कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
| Updated on: Nov 26, 2020 | 6:06 PM
Share

शिर्डी: वाढीव वीज बिलांविरोधातील (electricity bill issue) आंदोलनावेळी कोपरगाव येथील वीज महामंडळाच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या मनसे (MNS) कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून गुरुवारी संध्याकाळी गुन्हे दाखल करण्यात आले. या कार्यकर्त्यांनी कोपरगाव येथील वीज वितरण कार्यालयाची तोडफोड केली होती. सरकारी कामात अडथळा आणणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे असे आरोप या कार्यकर्त्यांवर लावण्यात आले आहेत. (MNS agitation against electricity bill issue)

प्राथमिक माहितीनुसार, पाच कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. तर आज सकाळी पोलिसांनी वीज कार्यालयातील तोडफोडीनंतर मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. यावेळी वीज वितरणचा एक कर्मचारीही जखमी झाला होता.

वाढीव वीज बिलांविरोधात मनसेकडून आज राज्यभरात आंदोलने करण्यात आली. पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. मात्र, सरकारचा आदेश झुगारून राज्यभरात मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरताना दिसले. यापैकी मुंबई आणि ठाण्यातील मोर्चामध्ये मनसेचे कार्यकर्ते मोठ्याप्रमाणावर सहभागी झाले होते.

ठाण्यात पोलिसांकडून मनसेचा मोर्चा अडवण्यात आला. त्यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालत बॅरिकेट्स फेकून दिल्या. ‘ठाकरे सरकार हाय हाय’, ‘मनसे जिंदाबाद’, ‘राज ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो’, अशा घोषणा देत मोर्चेकऱ्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. त्यामुळे पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालत बाचाबाची केली. त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी मनसे नेते अभिजीत पानसे, अविनाश जाधव आणि रवी मोरेंसह शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते.

मुंबईत प्रचंड मोर्चा

मुंबईत मनसेचे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई आदींच्या उपस्थितीत वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेचा प्रचंड मोर्चा काढण्यात आला. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सरकार जर गंभीर असेल तर दखल घेईल, जर गंभीर नसेल तर मनसेच्या भाषेत इथून पुढे सरकारला उत्तर दिलं जाईल, असा इशारा मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिला. यावेळी आम्ही वीजबिल भरणार नाही. कोणी वीज कापण्यासाठी आलं तर त्याच्या कानाखाली शॉक काढू, असा इशाराही देशपांडे यांनी दिला.

संबंधित बातम्या:

विजेचं कनेक्शन कापायला आले तर शॉक देणार, मनसेचा राज्य सरकारला इशारा

MNS Morcha Against Electricity Bill ! राज्यभरात मनसेचा आंदोलनाचा ‘झटका’; मुंबईत विराट मोर्चा, तर ठाण्यात पोलीस-मनसे कार्यकर्त्यांत बाचाबाची

MNS Morcha Against Electricity Bill : वाढीव वीजबिलाविरोधात मनसेचा ‘झटका मोर्चा’, कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की

(MNS agitation against electricity bill issue)

पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.