धनगर समाजाला विश्वासात न घेता नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, 16 ऑक्टोबरला चक्काजामचा इशारा

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबत धनगर नेत्यांची झालेली बैठक धनगर समाजाला विश्वासात न घेता आयोजित केली असल्याचा आरोप ऑल इंडिया धनगर समाज महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी केला आहे.

धनगर समाजाला विश्वासात न घेता नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, 16 ऑक्टोबरला चक्काजामचा इशारा
Follow us
| Updated on: Oct 11, 2020 | 7:42 PM

सातारा : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबत धनगर नेत्यांची झालेली बैठक धनगर समाजाला विश्वासात न घेता आयोजित केली असल्याचा आरोप ऑल इंडिया धनगर समाजाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी केला आहे. त्यामुळे आरक्षणासाठी नियोजित 16 ऑक्टोबरला होणारे राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन होणारच असल्याचा निर्धार काकडे यांनी बोलून दाखवला आहे. (Pravin kakde Warns Raod Block Agitation over Dhangar reservation)

साताऱ्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांसोबत झालेली धनगर नेत्यांची बैठक ही समाजाला विश्वासात न घेता झाली आहे, असा आरोप काकडे यांनी केला. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार दुर्लक्ष करत आहे, अशी टीका त्यांनी केली.

नुकतीच धनगर समाजातील नेत्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत आरक्षणाबाबत बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जरी आश्वासन दिले असले तरी धनगर समाजात मात्र अजुनही एकी नसल्याचे स्पष्ट होत आहे. ऑल इंडिया धनगर समाज दिल्ली- महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रविण काकडे यांनी या बैठकीबाबत नाराजी व्यक्त करत धनगर समाजातील लोकांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप केला.

यामुळे धनगर समाजासाठी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करून धनगर समाजाला एस. टी. सर्टिफिकेट मिळावीत आणि आदिवासी समाजाच्या सवलती लागू कराव्यात या प्रमुख मागण्यांसाठी येत्या 16 ऑक्टोबरला संपूर्ण राज्यभरात धनगर समाज रस्त्यावर उतरुन रास्ता रोको आणि चक्काजाम आंदोलन करणार असल्याची घोषणा काकडे यांनी पत्रकार परिषदेत केली.

धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत सकारात्मक पावलं उचलणार, मुख्यमंत्र्यांचा शब्द धनगर समाजाच्या आर्थिक विकासाच्या व अन्य मागण्यांबाबत सकारात्मक पावले उचलली जातील. आरक्षणासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यासाठी कायदेतज्ज्ञ आणि विविध घटकांशी समन्वय साधला जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धनगर समाज शिष्टमंडळाला दिला.

(Pravin kakde Warns Raod Block Agitation over Dhangar reservation)

संबंधित बातमी

धनगर समाजाच्या आरक्षण आणि आर्थिक विकासाच्या मागण्यांबाबत सकारात्मक पावले उचलणार : मुख्यमंत्री

Non Stop LIVE Update
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.