AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ, परदेशात न जाताही पुण्यात महिलेला कोरोनाची लागण

पुण्यात एका 41 वर्षीय महिलेला (Pune Corona Patient) कोरोनाची लागण झाली आहे. या महिलेला परदेशात न जाता कोरोनाची लागण झाली आहे.

राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ, परदेशात न जाताही पुण्यात महिलेला कोरोनाची लागण
| Edited By: | Updated on: Mar 21, 2020 | 5:52 PM
Share

पुणे : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत (Pune Corona Patient) आहे. पुण्यात आणखी एका महिलेला कोरोनाची लागण आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 53 झाली आहे. तर पुण्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 22 वर पोहोचली आहे. सध्या या महिलेवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात एका 41 वर्षीय महिलेला (Pune Corona Patient) कोरोनाची लागण झाली आहे. या महिलेला परदेशात न जाता कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून तिला ताप आणि सर्दीचा त्रास होत होता. त्यानंतर तिचे नमुने तपासले असता ती कोरोना पॉझिटिव्ह सापडली आहे. त्यामुळे आता ही महिला नेमकी कोणाच्या संपर्कात आली? तिला कोरोनाचा संसर्ग कसा झाला? याची तपासणी सुरु आहे.

हेही वाचा : Corona Virus | मुंबई, पुणे, नागपुरातील व्यवहार ठप्प, राज्यातील 10 शहरं लॉक डाऊन

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत राज्यात 53 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यातील 41 जणांची प्रकृती उत्तम असून आठ जणांना सौम्य लक्षणे पाहायला मिळत आहेत.

पुण्यात आतापर्यंत कोरोनाचे पिंपरी 12 आणि पुणे 9 मिळून 21 रुग्ण आढळले आहेत. राज्यात सर्वाधिक रुग्ण पुण्यातच आढळले आहेत. त्यामुळे पुण्यात सर्वाधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे.

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

  • पिंपरी चिंचवड – 12
  • पुणे – 11
  • मुंबई – 20
  • नागपूर – 4
  • यवतमाळ – 4
  • कल्याण – 4
  • नवी मुंबई – 3
  • अहमदनगर – 2
  • पनवेल – 1
  • ठाणे -1
  • औरंगाबाद – 1
  • रत्नागिरी – 1
  • उल्हासनगर – 1 एकूण 65

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

  • पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च
  • पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च
  • मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
  • नागपूर (1) – 12 मार्च
  • पुणे (1) – 12 मार्च
  • पुणे (3) – 12 मार्च
  • ठाणे (1) – 12 मार्च
  • मुंबई (1) – 12 मार्च
  • नागपूर (2) – 13 मार्च
  • पुणे (1) – 13 मार्च
  • अहमदनगर (1) – 13 मार्च
  • मुंबईत (1) – 13 मार्च
  • नागपूर (1) – 14 मार्च
  • यवतमाळ (2) – 14 मार्च
  • मुंबई (1) – 14 मार्च
  • वाशी (1) – 14 मार्च
  • पनवेल (1) – 14 मार्च
  • कल्याण (1) – 14 मार्च
  • पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च
  • औरंगाबाद (1) – 15 मार्च
  • पुणे (1) – 15 मार्च
  • मुंबई (3) – 16 मार्च
  • नवी मुंबई (1) – 16 मार्च
  • यवतमाळ (1) – 16 मार्च
  • नवी मुंबई (1) – 16 मार्च
  • मुंबई (1) – 17 मार्च
  • पिंपरी चिंचवड (1) – 17 मार्च
  • पुणे (1) – 18 मार्च
  • पिंपरी चिंचवड (1) – 18 मार्च
  • मुंबई (1) – 18 मार्च
  • रत्नागिरी (1) – 18 मार्च
  • मुंबई महिला (1) – 19 मार्च
  • उल्हासनगर महिला (1) – 19 मार्च
  • अहमदनगर (1) – 19 मार्च
  • मुंबई (2) – 20 मार्च
  • पुणे (1) – 20 मार्च
  • पिंपरी चिंचवड (1)- 20 मार्च
  • पुणे (2) – 21 मार्च
  • मुंबई (8) – 21 मार्च
  • यवतमाळ (1) – 21 मार्च
  • कल्याण (1) – 21 मार्च
  • एकूण – 65 कोरोनाबाधित रुग्ण

कोरोनामुळे आतापर्यंत कुठे किती मृत्यू?

  • कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च
  • दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च
  • मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च
  • पंजाब – एका रुग्णाचा मृत्यू (1) – 19 मार्च
  • एकूण – 4 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ

दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?.

दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल.

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान.

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?