लवासामध्ये कोव्हिड सेंटर उभारा, भाजप खासदार गिरीश बापटांची मागणी

| Updated on: Jul 30, 2020 | 12:24 PM

पुण्यातील भाजप खासदार गिरीश बापट यांनी लवासामध्ये कोव्हिड सेंटर सुरु करण्याची मागणी केली आहे. Girish Bapat lavasa Covid Center

लवासामध्ये कोव्हिड सेंटर उभारा, भाजप खासदार गिरीश बापटांची मागणी
Follow us on

पुणे : पुण्यातील भाजप खासदार गिरीश बापट यांनी लवासामध्ये कोव्हिड सेंटर सुरु करण्याची मागणी केली आहे. गिरीश बापट यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. इतकंच नाही तर आज पुण्यात होणाऱ्या बैठकीत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेही ही मागणी करणार असल्याचं गिरीश बापट म्हणाले. ( BJP MP Girish Bapat demands Covid Center in Lavasa)

मुळशी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय, त्या पार्श्वभूमीवर लवासामध्ये कोव्हिड सेंटर सुरु करावं, अशी मागणी खासदार बापट यांनी केली. यासंदर्भात खासदार गिरीश बापट यांनी प्रशासनाशी पत्रव्यवहार केला. पुणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद सीईओ यांना त्यांनी पत्र पाठवलं आहे.

लवासामधील रुग्णालय आणि हॉटेल कोव्हिड सेंटरसाठी ताब्यात घेण्याची मागणी, त्यांनी केली आहे. मात्र हॉटेल आणि रुग्णालय ताब्यात देण्यास राजकीय दबाव असू शकतो, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडे बोट दाखवलं.

मुख्यमंत्री पुणे दौऱ्यावर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री पुण्यात दाखल झाले. उद्धव ठाकरे स्वतः गाडी चालवत सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास ‘मातोश्री’हून पुण्याला निघाले. पुणे शहर आणि पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाच्या संसर्गासंदर्भात सुरु असलेल्या उपाययोजनांचा आढावा ते बैठकीत घेणार आहेत. यावेळी पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही त्यांच्यासह उपस्थित असतील.

( BJP MP Girish Bapat demands Covid Center in Lavasa)

संबंधित बातम्या 

Uddhav Thackeray in Pune Live | मुख्यमंत्री पुणे दौऱ्यावर, स्वतः गाडी चालवत ‘मातोश्री’हून रवाना