AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात आणखी 99 कोरोना रुग्णांची वाढ, एकूण आकडा 2245 वर

कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या पुण्यात वाढतच आहे. आज (8 मे) दिवसभरात 99 नवीन रुग्णांची वाढ झाली (Pune Corona Updates ).

पुण्यात आणखी 99 कोरोना रुग्णांची वाढ, एकूण आकडा 2245 वर
| Updated on: May 09, 2020 | 12:49 AM
Share

पुणे : कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या पुण्यात वाढतच आहे. आज (8 मे) दिवसभरात 99 नवीन रुग्णांची वाढ झाली (Pune Corona Updates ). आता एकूण रुग्णांची संख्या 2245 इतकी झाली आहे. पुण्यात गेल्या 24 तासात तब्बल 12 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. हा आतापर्यंतच्या मृत्यूंचा उच्चांकी आकडा आहे. पुणे मनपा हद्दीत गुरुवारी (7 मे) 7 वाजल्यापासून शुक्रवारी (8 मे) 7 वाजेपर्यंत तब्बल 11 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. तर ग्रामीण भागातही एका बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. म्हणजेच जिल्ह्यात एकूण 12 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या 136, तर जिल्ह्यात 146 इतकी झाली आहे.

मृतांमध्ये 7 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश आहे. मृत हे 48 ते 85 वयोगटातील आहेत. दिवसभरात 99 नवीन रुग्णांची वाढ झाल्यानं शहरात आतापर्यंत 2245 रुग्ण झाले. आज उपचारानंतर बरे झालेल्या 61 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत 732 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. आता पुण्यातील अॅक्टिव रुग्णांची संख्या 1377 असून 76 रुग्णांची स्थिती गंभीर आहे. यातील 12 जण व्हेंटिलेटरवर आहेत.

पुण्यातील ससून रुग्णालयात 3 कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालीय. गुरुवारी रात्री सात वाजल्यापासून शुक्रवारी रात्रीच्या सातपर्यंत हे मृत्यू झालेत. मृतांमध्ये 2 जेष्ठ महिला आणि एका 48 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. या मृतांमध्ये घोरपडी पेठेतील 76 वर्षे महिलेचा समावेश आहे. या महिलेला कोरोनासह रक्तदाब, किडनी आणि इतर व्याधी असल्यानं मृत्यू झाला. तर पद्मावती परिसरातील 82 वर्षीय महिलेचा कोरोनासह इतर व्याधीने मृत्यू झालाय. या महिलेला सुद्धा मधुमेहासह इतर व्याधी होत्या. ताडीवाल परिसरातील 48 वर्षीय पुरुषाचा देखील कोरोनासह इतर व्याधी असल्यानं मृत्यू झाला. जिल्ह्यातील आणखी अहवाल आल्यानंतर ही आकडेवारी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता 19 हजार 063 वर पोहोचली आहे. आज (8 मे) दिवसभरात 1 हजार 089 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर राज्यात आज 169 कोरोनाबाधित रुग्ण ठणठणीत बरे झाले असून त्यांना घरी (Maharashtra Corona Virus Cases Update) सोडण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यभरात 3,470 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

दिवसभरात 37 कोरोनाबाधितांचा मृत्यू

आज राज्यात 37 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाबळीची एकूण संख्या 731 झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबई मधील 25, पुण्यातील 10, जळगावमधील 1 आणि अमरावती शहरातील एकाचा समावेश आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra University Exams | विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम दूर, फक्त अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार

Maharashtra Corona Update | राज्यात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट, रुग्णांचा आकडा 19 हजारांच्या पार

हृदयविकाराने मृत्यू, जवळ कोणीही नातेवाईक नाहीत, बॅचलर तरुणावर एकट्या पोलिसाकडून विधीवत अंत्यसंस्कार

Pune Corona Updates

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.