AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra University Exams | विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम दूर, फक्त अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पदवी आणि पदव्युत्तर कोर्सच्या फक्त अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षाच घेतल्या जाणार आहेत.

Maharashtra University Exams | विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम दूर, फक्त अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार
| Updated on: May 08, 2020 | 11:43 PM
Share

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पदवी आणि पदव्युत्तर (Maharashtra University Exams) कोर्सच्या फक्त अंतिम वर्षाच्या, अंतिम सत्राच्या परीक्षाच घेतल्या जाणार आहेत, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात सध्या लॉकडाऊन आहे. त्या अनुषंगाने युजीसीने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या परीक्षेसंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नेमलेल्या समितीचा अहवाल शासनाला सादर केला. त्यानुसार, सर्व पदवी आणि पदव्युत्तर कोर्सच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा या 1 जुलै ते 30 जुलै या दरम्यान घेण्यात (Maharashtra University Exams) येतील, असे उदय सामंत (Uday Samant) यांनी सांगितलं.

राज्यातील विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेसंदर्भातील संभ्रम दूर करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या फेसबुक पेजवरुन आज विद्यार्थ्यांशी लाईव्ह संवाद साधला.

समितीने दिलेल्या अहवालाविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा करुन विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करुनच निर्णय घेण्यात येत आहे. जर राज्यात कोरोनाची परिस्थिती अशीच राहिली आणि लॉकडाऊन कालावधी वाढला, तर पुन्हा एकदा 20 जूनपर्यंत या विषयी फेरआढावा घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

“समितीने केलेल्या शिफारशीनुसार ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार नाहीत त्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे. हा प्रवेश देताना त्यांचे ग्रेड्स आणि मार्क्स ही त्यांना दिले जातील. ही मार्क्स देण्याची पद्धती ही विद्यार्थ्यांना मिळणारी 50 टक्के ग्रेड ही अंतर्गत मुल्यमापनावर आधारीत आणि 50 टक्के या पूर्वीच्या सत्रातील परीक्षेचे गुण यावरून ठरणार आहे. पूर्वीच्या परीक्षा किंवा सत्रांचे गुण उपलब्ध नसल्यास वार्षिक सत्राच्या पहिल्या वर्षांच्या (Maharashtra University Exams) परीक्षांच्या बाबत 100 टक्के अंतर्गत मूल्यमापन करण्यात येणार आहे. या गुणांबाबत काही शंका असल्यास तसेच त्यामध्ये मुल्यवर्धन करण्याची विद्यार्थ्याची इच्छा असल्यास त्यास ऐच्छिक परीक्षा देता येणार आहे. अशा प्रकारच्या परीक्षांबाबत विद्यापीठ स्तरावर निर्णय घेण्यात येणार आहे.”

“जर एखादा विद्यार्थी या परीक्षांमध्ये नापास झाला तर त्यालाही पुढील वर्षात प्रवेश दिला जाईल पण, त्यांना नापास झालेल्या विषयांची परीक्षा द्यावी लागेल. या विषयीचे वेळापत्रकाचे निर्णय ही विद्यापीठ स्तरावर घेण्यात येणार आहेत. एटीकेटीच्या विद्यार्थ्यांनाही हाच नियम लागू असणार आहे. हा निर्णय घेत असताना कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होणार नाही याची पूर्ण दक्षता येईल”, असे उदय सामंत यांनी संगितले.

“उन्हाळी सुट्टीबाबत प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांचा विचार करुन प्रत्येक विद्यापीठाने त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा. युजीसीने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार शैक्षणिक वर्ष हे 1 सप्टेंबरपासून सुर करायचे आहे. त्या दृष्टीने उच्च व तंत्रशिक्षण विभाग काम करत आहे.”

“समितीने दिलेल्या या अहवालास सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंनी सहमीती दर्शवली आहे. लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थी हे महाविद्यालयांमध्ये उपस्थित होते असे गृहीत धरुनच त्यांची उपस्थित गृहीत धरण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता कोणत्याही प्रकारच्या संभ्रमास बळी पडू नये आणि आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावं”, असं आवाहन उदय सामंत यांनी यावेळी केले.

कुणाची परीक्षा होणार?

  •  स्वायत्त विद्यापीठांनाही विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) निर्देशाप्रमाणे याच फॉरमॅटद्वारे परीक्षा घ्याव्या लागणार आहेत.
  •  चार वर्षाचा कोर्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ आठव्या सत्राची (सेमिस्टर) परीक्षा द्यावी लागणार आहे. तसेच पाच वर्षाचा कोर्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ 10 व्या सेमिस्टरची परीक्षा द्यावी लागेल.
  •  ज्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा वार्षिक होतात, त्यांच्या केवळ अंतिम वर्षाच्या विद्यार्थांची परीक्षा घेण्यात येईल.
  •  दोन वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या केवळ चौथ्या सत्राची (सेमिस्टर) परीक्षा होईल.
  •  गोंडवाना विद्यापीठ हे ग्रीन झोनमध्ये येत असल्यामुळे तेथील अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबत मुभा दिली आहे. या विद्यापीठांतर्गत गडचिरोली आणि चंद्रपूर हे जिल्हे येतात. येथील भोगोलिक परिस्थिती पाहून विद्यापीठ स्वतःच्या वेळापत्रकानुसार परीक्षा घेतील
  •  एसएनडीटी विद्यापीठाच्या राज्यातील महाविद्यालयीन परीक्षा या वेळापत्रकानुसारच होतील

Maharashtra University Exams

संबंधित बातम्या :

यंदा फीवाढ करु नका, मंत्री वर्षा गायकवाड यांचे शिक्षण संस्थांना आदेश

Navi Mumbai Corona | APMC मार्केट 11 ते 17 मेदरम्यान पूर्ण बंद, पाचही मार्केट बंद राहणार

Maharashtra Corona Update | राज्यात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट, रुग्णांचा आकडा 19 हजारांच्या पार

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.