लग्नासाठी दबाव, पुण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणीसमोर गोळीबार

लग्नाला नकार दिल्यामुळे चिडलेला आरोपी अक्षय दंडवतेने जुन्नरमध्ये तरुणीच्या पायाजवळ गोळीबार करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

लग्नासाठी दबाव, पुण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणीसमोर गोळीबार

पुणे : पुण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणाने तरुणीसमोरच जमिनीवर गोळीबार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जुन्नर तालुक्यातील जांबुत फाटा परिसरात रविवारी भरदिवसा ही धक्कादायक घटना घडली. आरोपी अक्षय दंडवतेला नारायणगाव पोलिसांनी चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अटक केली. (Pune Man Firing in One Sided Love)

अक्षय दंडवते हा तक्रारदार तरुणीवर एकतर्फी प्रेम करत होता. अक्षय तिच्यावर लग्नासाठी दबावही टाकत होता. परंतु या दबावाला न झुकता तिने अक्षयला नकार दिला. तरुणीच्या नकारामुळे चिडलेल्या अक्षय दंडवतेने काल संध्याकाळच्या सुमारास तिला दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. तिच्या पायाजवळ गोळीबार करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचाडीजे लावण्यावरुन वाद, फेअरवेल पार्टीला गेलेल्या विद्यार्थ्यांना बाऊन्सरकडून मारहाण

गोळीबाराच्या वेळी आसपास असलेल्या नागरिकांनी ही घटना आपल्या मोबाईलध्ये कैद केली. त्यामुळे आरोपी अक्षय दंडवतेला अटक करण्यास उपयोग झाला. नारायणगाव पोलिसांनी अक्षय दंडवतेवर तात्काळ गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

राज्यभरात महिला अत्याचार आणि त्यांच्यावर हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसत आहे. एकतर्फी प्रेमातून तरुणाने गोळीबार केल्यामुळे राज्यातील तरुणाईला कायद्याचा धाक राहिला नाही का? राज्यात खरंच महिला सुरक्षित आहेत का? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. (Pune Man Firing in One Sided Love)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI