घराबाहेर खेळत असताना आठ वर्षीय मुलीचे अपहरण, बलात्कारानंतर डोक्यात दगड घालून हत्या

भिवंडीत एका आठ वर्षीय मुलीवर बलात्कार करुन दगडाने ठेचून तिची हत्या (Rape on minor girl bhiwandi) करण्यात आली आहे.

घराबाहेर खेळत असताना आठ वर्षीय मुलीचे अपहरण, बलात्कारानंतर डोक्यात दगड घालून हत्या

ठाणे : भिवंडीत एका आठ वर्षीय मुलीवर बलात्कार करुन दगडाने ठेचून तिची हत्या (Rape on minor girl bhiwandi) करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना भिवंडीतील कारीवली ग्रामपंचायत येथील सुभाष नगर परिसरात घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ (Rape on minor girl bhiwandi) उडाली आहे. पोलिसांनी आरोपी भरतकुमार धनीराम याला अटक केली असून अधिक तपास करत आहेत.

ही आठ वर्षीय मुलगी काल (21 डिसेंबर) रात्री साडे नऊच्या सुमारास घराबाहेर खेळत असताना ती आईस्क्रीम विकणाऱ्या गाडीजवळ आईस्क्रीम खरेदीसाठी गेली. पण त्यानंतर ती घरी परतली नाही. ती घराबाहेर खेळत असताना तिचे आरोपी भरतकुमारने अपहरण केले. त्यानंतर घरापासून 50 ते 60 मीटर अंतरावर असलेल्या मोकळ्या जागेतील झुडपात तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर डोक्यात दगड घालून तिची हत्या केली.

मुलगी रात्री साडे नऊ वाजल्यापासून घरी न आल्यामुळे तिचे आई-वडील रात्री दोन वाजेपर्यंत आपल्या मुलीचा शोध घेत होते. मुलीचा शोध लागत नसल्यामुळे घरच्यांनी थेट पोलिसांना कळवले. त्यानंतर सकाळी सहा वाजताच्या सुमारास तेथील झुडुपात शौचास गेलेल्या व्यक्तीस चिमुरडीचा मृतदेह आढळला. त्याने तातडीने ही माहिती मृत मुलीच्या कुटुंबीयांना दिली. चिमुरडीचा मृतदेह पाहता तिच्या कुटुंबियांनी टाहो फोडला. आपल्या मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी हत्या झालेल्या पीडितेच्या आईने केली आहे.

या घटनेचे गांभीर्य पाहता पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी भरतकुमार विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी याच परिसरात राहतो असल्याचे सांगितलं जात आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Published On - 4:00 pm, Sun, 22 December 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI