नागपुरात रेशन माफियांचा सुळसुळाट, शहरात रेशनचं धान्य विकणारी टोळी सक्रीय

रेशन दुकानातून मिळणारं धान्य बाहेर विकलं जात असल्याचं, रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गुड्डू अग्रवाल यांनी मान्य केलं.

नागपुरात रेशन माफियांचा सुळसुळाट, शहरात रेशनचं धान्य विकणारी टोळी सक्रीय
| Updated on: Sep 24, 2020 | 4:31 PM

नागपूर : नागपुरात रेशन माफियांचं रॅकेट सक्रीय झालं आहे (Ration Mafia Racket In Nagpur). रेशन दुकानातून मिळालेल्या धान्याची अवैध विक्री नागपुरात सुरु आहे. मोफत मिळालेलं धान्य पुन्हा काळ्या बाजारात विकण्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात घडत आहे. मोफत मिळालेल्या धान्याची 10-15 रुपये किलोने विक्री केली जात आहे (Ration Mafia Racket In Nagpur).

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर केंद्र सरकारने गरीबांना 5 किलो गहू आणि 5 किलो तांदूळ मोफत देण्याचा निर्णय घेतला. पण नागपुरात रेशन दुकानातून मोफत मिळणारं हे धान्य पुन्हा बाजारात अवैध विक्रीला येत आहे. शिवाय, रेशनवरचं धान्य विक्रीचं एक मोठं रॅकेट नागपुरात सक्रीय असल्याची माहिती आहे.

रेशन दुकानातून मिळालेलं स्वस्त धान्य बाहेर विकण्यास परवानगी नाही. तसेच, विक्री करताना कुणी आढळल्यास कारवाई केली जाते. पण, नागपूर जिल्ह्यात रेशनवर मिळणारं मोफत धान्य 10 ते 15 रुपये किलोने बाहेर विकलं जातं आहे. त्यानंतर हे धान्य पुन्हा बाजारात आणलं जातं किंवा रेशन माफीयांद्वारे व्यापाऱ्यांना विकलं जातं आहे.

रेशन दुकानदार संघटनेने ही बाब कबूल केली आहे. रेशन दुकानातून मिळणारं धान्य बाहेर विकलं जात असल्याचं, रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गुड्डू अग्रवाल यांनी मान्य केलं. रेशन माफीयांजवळ शस्त्र असून शहरभर यांचं रॅकेट असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Ration Mafia Racket In Nagpur

संबंधित बातम्या : 

मुंबई तुंबल्यावर बोंबा मारणारे नागपूर, अहमदाबाद जलमय झाल्यावर गप्प का? शिवसेनेची टीका

Covishield Vaccine | ‘कोविशील्ड’ लसीच्या मानवी चाचणीसाठी नागपूरच्या रुग्णालयाला परवानगी