उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे शुभमंगल, भपकेबाज सोहळ्याला कात्री, रजिस्टर पद्धतीने विवाह

चंद्रशेखर परदेशी आणि शुभाली परिहार या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी भपकेबाज सोहळ्याला कात्री लावत साधेपणाने रजिस्टर विवाह केला.

उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे शुभमंगल, भपकेबाज सोहळ्याला कात्री, रजिस्टर पद्धतीने विवाह
Follow us
| Updated on: Nov 25, 2020 | 4:02 PM

अहमदनगर : लग्न म्हटलं की प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा क्षण हा क्षण विशेष करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या शक्कल लढवली जातात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जातो आणि लग्न सोहळा नेत्रदीपक करण्यासाठी वाटेल ते करण्याची वधुवरांची आणि तिची तयारी असते. परंतु अहमदनगर जिल्ह्यात यूपीएससी पास झालेले चंद्रशेखर परदेशी आणि एमपीएससी पास झालेल्या शुभाली परिहार यांनी लग्नाचा वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. (register marriage First Class officer in nagar)

चंद्रशेखर परदेशी आणि शुभाली परिहार या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी भपकेबाज सोहळ्याला कात्री लावत साधेपणाने रजिस्टर विवाह केला. त्यांनी घेतलेल्या स्तुत्य निर्णयाचं जिल्ह्यात कौतुक होताना दिसून येत आहे.

अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील चिखली गावातील चंद्रशेखर परदेशी हा सामान्य शेतकऱ्याच्या मुलाचं शालेय शिक्षण गावातच पूर्ण झालं. नंतर पुण्यात इंजिनिअरिंग केलं. इंजिनिअरला मिळणार पगार पाहून स्पर्धा परीक्षेत उतरण्याचा निर्णय घेतला मन लावून अभ्यास केला आणि 2018 साली सहाव्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास झाला.

असाच काहीसा परिचय शुभाली परिहारचा आहे. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात असलेल्या चालबुर्ग गावातील शिक्षकाच्या कुटुंबातील शुभाली ही मुलगी. पदवी पूर्ण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करुन पहिल्याच प्रयत्नात एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाली. सध्या विक्रीकर निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. दोघांच्या नातेवाईकांनी लग्नासाठी पुढाकार घेतला.

लग्न जुळली मात्र दोघंही एका गोष्टीवर ठाम होते. ती म्हणजे लग्न गाजावाजा करून करायचं नाही तर रजिस्टर पध्दतीने करायचं यांच मोठं कारण म्हणजे आजही लोक मुलाच्या लग्नासाठी मोठा खर्च करता शिक्षणात खर्च करत नाहीत. आपण स्वतः रजिस्टर पध्दतीने लग्न करुन हाच संदेश समजला द्यायचा, असा निर्णय दाम्पत्यने घेतला.

आपल्या समाजात लग्न ही मोठी खर्चिक गोष्ट करुन ठेवलेली आहे. लग्नमंडप, आहेर, डीजे, जेवण, वरात या आणि अशा विविध गोष्टींमिळे लाखो रुपयांचा खर्च लग्नामध्ये होत असतो. मात्र या सगळ्या गोष्टींनाच आम्हाला फाटा देऊन रजिस्टर पद्धतीने लग्न करायचं होतं आणि म्हणूनच आम्ही तश्याच पद्धतीने लग्न केलंय, अशा भावना नव दाम्पत्यांनी व्यक्त केल्या.

(register marriage First Class officer in nagar)

संबंधित बातम्या

नवरदेव पीपीई किट घालून बोहल्यावर, नवरीच्या डोक्यावर प्लास्टिक हेल्मेट, अनोखा विवाह सोहळा

व्हॅलेन्टाईन विशेष : कॅन्सरग्रस्त तरुणाशी तुम्ही लग्न कराल का? रत्नागिरीच्या सोनालीच्या प्रेमाला सलाम!!

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.