AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्र सरकार कुणाला घाबरत नाही, बिहार निवडणुकीसाठी सुशांतच्या आत्महत्येवरुन राजकारण : रोहित पवार

आमदार रोहित पवार यांनी सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात भाजपवर राजकारण करत असल्याचा आरोप केला (Rohit Pawar on Sushant Singh Suicide case).

महाराष्ट्र सरकार कुणाला घाबरत नाही, बिहार निवडणुकीसाठी सुशांतच्या आत्महत्येवरुन राजकारण : रोहित पवार
| Updated on: Aug 03, 2020 | 12:09 PM
Share

पुणे : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी जोरदार राजकारण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपने महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसंच्या तपासावर प्रश्न उपस्थित करत या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात भाजपवर राजकारण करत असल्याचा आरोप केला (Rohit Pawar on Sushant Singh Suicide case). तसेच महाराष्ट्रात सरकार कोणत्याही पक्षाचे असो, महाराष्ट्र सरकार कधीही कुणाला घाबरत नाही, असंही स्पष्टपणे सांगितलं.

रोहित पवार म्हणाले, “महाराष्ट्रात असलेलं कोणत्याही पक्षाचं सरकार कुणालाही घाबरत नाही हे आधी सर्वांनी लक्षात घ्यावं. शासकीय व्यक्ती महाराष्ट्रात येते. त्या ठिकाणी शासन-शासन यामध्ये पाळावयाचा प्रोटोकॉल पाळला जावा असं वाटतं. मात्र, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या खोलात जावंच लागेल. मुंबई पोलीस सक्षम आहेत. ते नक्कीच या प्रकरणाचा छडा लावतील.”

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“सध्या बिहारमध्ये विधानसभा निवडणूक येत आहे. त्यामुळे बिहारमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा मुद्दा वेगळ्या अर्थाने पेटवला जातो आहे,” असंही रोहित पवार यांनी सांगितलं.

दरम्यान, रोहित पवार यांनी याआधीच एक सविस्तर फेसबूक पोस्ट करत सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणावर आपली भूमिका मांडली होती. रोहित पवार म्हणाले होते, “अभिनेता सुशांत सिंहच्या बाबतीत घडलेली ही घटना सर्वांनाच चक्रावणारी व मनाला चुटपूट लावणारी आहे. या घटनेला आता दीड महिना झालाय. सुरुवातीला मुंबई पोलीस आणि चित्रपटसृष्टीपुरतं मर्यादित असलेलं हे प्रकरण आता हळूहळू राजकीय रंग घेतंय की काय अशी शंका येऊ लागलीय. सुशांत गुणी अभिनेता होता का? तर निश्चितच होता. त्याची आत्महत्या आपल्या सर्वांसाठीच क्लेशदायक आहे. त्यामुळं या घटनेत कुणी दोषी असेल तर त्याचा निष्पक्षपणे तपास व्हायलाच हवा.”

“गुणवत्तेमध्ये जगात ओळख असणारे मुंबई पोलीस तपास करण्यास सक्षम”

“गुणवत्तेमध्ये जगात ज्या ठराविक पोलिसांचं नावं घेतलं जातं त्यात मुंबई पोलिसांचाही समावेश आहे. त्यामुळं मुंबई पोलीस या घटनेचा सखोल तपास करतील, यात कोणतीही शंका नाही. या घटनेत चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गजांची त्यांनी आतापर्यंत चौकशीही केलीय. त्यामुळं मुंबई पोलीस हे सक्षम असून त्यांच्याकडून योग्य तपास होऊन याप्रकरणी न्याय मिळेल, असा विश्वास आहे. पण दरम्यानच्या काळात सुशांत सिंहच्या वडलांनी दिलेल्या तक्रारीनुसार बिहारमध्येही याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आणि लगोलग बिहार पोलीस या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी मुंबईतही दाखल झाले,” असं रोहित पवार यांनी नमूद केलं.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

“बिहार पोलिसांची कार्यतत्परता पाहून तेथील गुन्हेगारी कमी होईल अशी अपेक्षा”

रोहित पवार म्हणाले, “वास्तविक, बिहार पोलीस इतके कार्यतत्पर असतील हे मला माहित नव्हतं. तिथल्या कायदा व सुव्यवस्थेबाबत वृत्तपत्रातून किंवा टिव्हीवरुन ऐकलेल्या-वाचलेल्या बातम्यांमधून ते इतके दक्ष असतील असं वाटलं नव्हतं. की केवळ याच घटनेपुरती त्यांनी तत्परता दाखवली, हे माहीत नाही. पण असो. खरंच ते इतके कर्तव्यदक्ष असतील तर त्याचं स्वागतच करायला हवं आणि यामुळं बिहारमधील गुन्हेगारीचं प्रमाणही कमी होईल, अशी अशी अपेक्षा करायलाही हरकत नाही. मात्र एका लोकप्रिय अभिनेत्याच्या आत्महत्येचं कुणी राजकारण करत असेल तर ते चुकीचं आहे.”

बिहारमध्ये तोंडावर आलेल्या निवडणुका पाहिल्या तर या घटनेचा कुणीही आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी उपयोग करून घेता कामा नये आणि असं कुणी करत असेल तर तो प्रयत्न आपण सर्वांनीच हाणून पाडायला हवा, असंही आवाहन रोहित पवार यांनी केलं.

संबंधित व्हिडीओ :

हेही वाचा :

Sushant Rajuput case | पाटणा पोलीस कोटक बँकेत, तपास CBI नव्हे तर मुंबई पोलिसांकडेच

फडणवीसांकडून CBI चौकशीची मागणी, सुशांत प्रकरणात नव्या घडामोडी, रियाचा खंडणीबाबतचा व्हिडीओ व्हायरल

बिहार पोलीस कायद्याच्या कचाट्यात, मुंबई पोलिसांकडून नियम सांगत एसआयटीला समज

पुराव्यांशी छेडछाड होऊ नये, या प्रकरणात लक्ष द्या, सुशांतच्या बहिणीचं पंतप्रधान मोदींना आवाहन

Rohit Pawar on Sushant Singh Suicide case

Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.