फडणवीसांकडून CBI चौकशीची मागणी, सुशांत प्रकरणात नव्या घडामोडी, रियाचा खंडणीबाबतचा व्हिडीओ व्हायरल

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी केली आहे (Devendra fadnavis demand CBI inquiry on Sushant Singh Rajput suicide case).

फडणवीसांकडून CBI चौकशीची मागणी, सुशांत प्रकरणात नव्या घडामोडी, रियाचा खंडणीबाबतचा व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Jul 31, 2020 | 5:32 PM

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात वेगाने घडामोडी घडत आहेत. या प्रकरणाला आता राजकीय वळणदेखील मिळताना दिसत आहे. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी ट्विटद्वारे केली आहे. तर बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी मुंबई पोलिसांवर टीका केली आहे (Devendra fadnavis demand CBI inquiry on Sushant Singh Rajput suicide case).

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

“सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवावी, अशी अनेकांची मागणी आहे. मात्र, महाराष्ट्र सरकारच्या वागणुकीकडे बघितल्यावर तसं होणार नाही. पण याप्रकरणी ईडीने तरी ईसीआयआर दाखल करुन मनी लॉन्ड्रिंग आणि मनी ट्रेलिंगबाबत चौकशी करावी”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत (Devendra fadnavis demand CBI inquiry on Sushant Singh Rajput suicide case).

हेही वाचा : Sushant Death | आधी कंपनीच्या नावात ‘रिया’लिटी शब्द आणला, मग संचालकपद सोडले, रिया चक्रवर्ती संशयाच्या भोवऱ्यात

बिहार पोलिसांच्या पथकामार्फत मुंबईत सुरु असलेल्या चौकशीवरुन पाटण्यातील बिहार पोलीस महासंचालकांच्या कार्यालयात उच्च स्तरीय बैठक सुरु आहे. याशिवाय बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी मुंबई पोलीस बिहार पोलिसांच्या पथकाला सहकार्य करत नसल्याचा आरोप केला आहे.

“बिहार पोलिसांच्या तपासात मुंबई पोलीस अडथळा आणत आहेत. बिहार पोलीस याप्रकरणाचा छडा लावण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत आहेत. मात्र, मुंबई पोलिसांकडून सहकार्य मिळताना दिसत नाही. त्यामुळे सीबीआयने याप्रकरणाची दखल घ्यावी, असं भाजपला वाटतं”, असं सुशील कुमार मोदी म्हणाले आहेत.

हेही वाचा : बिहार पोलिसांच्या तपासाचा धडाका, आधी कोटक बॅंकेत तपास, मग अंकिताचा जबाब

ईडी चौकशी करणार

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी आता सक्तवसुली संचालनालय (ईडी) तपास करणार आहे. याप्रकरणी ईडीने इन्फोर्समेंट केस रिपोर्ट नोंदवला आहे. ईडी आता सुशांतच्या बँक खात्याशी संबंधित आर्थिक देवाणघेवाणीची चौकशी करणार आहे. सुशांतचे बँक खात्याचे सर्व डिटेल्स तपासले जातील. आर्थिक व्यवहार काय आणि कसे झाले, याची चौकशी होणार आहे.

ईडी मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चर्कवर्तीची चौकशी करणार आहे. ईडीने याबाबत बिहार पोलिसांना सूचान दिल्या आहेत. याप्रकरणी मनी लॉन्ड्रिंगची केस दाखल करावी, अशी सूचना ईडीकडून देण्यात आली आहे.

रिया चक्रवर्तीचा व्हिडीओ व्हायरल

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण नव्या वळणावर आलं असताना रिया चक्रवर्तीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ माहिती अधिकार कार्यकर्ते बिनू वारगीस यांनीदेखी ट्विट केला आहे. या व्हिडीओत रियाकडून खंडणीचा उल्लेख केल्याचं निदर्शनास येत आहे.

संबंधित बातम्या :

 पाटणा पोलीस कोटक बँकेत, तपास CBI नव्हे तर मुंबई पोलिसांकडेच

 रियाने सुशांतला खूप त्रास दिला, अंकिता लोखंडेचा धक्कादायक जबाब, व्हॉट्सअ‍ॅप चॅटचा दाखला

सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर बिहार पोलीस मुंबईत, रिया चक्रवर्ती अटकपूर्व जामिन अर्जाच्या तयारीत

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.