Saaho Teaser : प्रभासच्या ‘साहो’चा टीझर प्रदर्शित

बॉम्ब, हवेत उडणाऱ्या गाड्या आणि त्यात मध्येच बाईकवर बसलेला प्रभास असे हे नवीन पोस्टर आहे. "साहोच्या जगात सैर करण्यासाठी तयार व्हा, उद्या सकाळी 11.23 मिनीटांनी साहोचा टीझर प्रदर्शित होणार आहे".

Saaho Teaser : प्रभासच्या 'साहो'चा टीझर प्रदर्शित


मुंबई : बाहुबली अर्थातच तामिळ सुपरस्टार प्रभास आणि बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर यांचा आगामी ‘साहो’ चित्रपटाचा आणखी एक टीझर आज (13 जून) प्रदर्शित झाला आहे. तमिळ, मल्याळम, तेलगू आणि हिंदी  भाषेत या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. मात्र अद्याप हिंदी भाषेत या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झालेला नाही.

काल (12 जून) साहो चित्रपटाचे एक नवीन पोस्टर लाँच करण्यात आले. बॉम्ब, हवेत उडणाऱ्या गाड्या आणि त्यात मध्येच बाईकवर बसलेला प्रभास असे हे नवीन पोस्टर आहे. या पोस्टरवरुन हा चित्रपट अॅक्शन थ्रीलर असणार आहे याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. हा चित्रपट येत्या 15 ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

प्रभास हा तमिळ अभिनेता असला, तरी बाहुबली या चित्रपटानंतर त्याच्या बॉलिवूडच्या चाहत्यांमध्ये प्रचंड वाढ झाली. साहो चित्रपटाची घोषणा केल्यापासूनच हा चित्रपट कधी येणार याची अनेकांना उत्सुकता लागली आहे. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रभास किंवा श्रद्धा कपूरने साहोचे विविध पोस्टर प्रदर्शित केले. तसेच श्रद्धा कपूरच्या वाढदिवशी साहोच्या टीमने या चित्रपटाचा टीझर लाँच करुन तिला सरप्राईजही दिले होते. चित्रपटाच्या टीमने प्रसिद्ध केलेल्या टीझर आणि पोस्टरवरून यात हॉलिवूड चित्रपटाप्रमाणेच अॅक्शन थ्रील पाहायला मिळत आहे.

‘साहो’ सिनेमा चित्रीत करताना कोणताही सीन लीक होऊ नये, याची योग्य ती काळजीही घेण्यात येत आहे. अॅक्शन थ्रिलर असणाऱ्या या चित्रपटाविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते फार उत्सुक झाले आहे. ही उत्सुकता पाहूनच साहोचा दुसरा टीझर आज प्रदर्शित करण्यात आला आहे.

या टीझरच्या प्रदर्शनापूर्वी प्रभासने एक पोस्टर लाँच केले. या पोस्टरखाली कॅप्शन देताना, “डार्लिंग फक्त एक दिवस बाकी आहे, साहोच्या जगात सैर करण्यासाठी तयार व्हा, उद्या सकाळी 11.23 मिनीटांनी साहोचा टीझर प्रदर्शित होणार आहे”. त्याच्यासह श्रद्धा कपूरनेही उद्या या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होणार असल्याची घोषणा ट्विटरद्वारे केली आहे. “भारताच्या सर्वात मोठ्या अक्शन इंटरटेनरसाठी तयार राहा” असे तिने सांगितले.

साहो या चित्रपटात प्रभास, श्रद्धा कपूर, यांच्यासह अभिनेता नील नितिन मुकेश,  जॅकी श्रॉफ,  मंदिरा बेदी,  महेश मांजरेकर आणि चंकी पांडे हे कलाकार दिसणार आहे. यूवी क्रियेशन प्रोडक्शन आणि टी-सिरिज मिळून हा चित्रपट तयार केला आहे. तर या अॅक्शन थ्रिलर चित्रपट वामसी, प्रमोद आणि विक्रम यांनी मिळून निर्मिती केली आहे. त्याचसोबत चित्रपटाचे दिग्दर्शन सुजीत यांनी केले आहे. येत्या 15 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.

‘साहो’ हा चित्रपट मूळ तामिळ भाषेत प्रदर्शित होणार असून हा चित्रपट  हिंदी, मल्याळम आणि तेलगु अशा चार भाषांमध्ये डब करण्यात येणार आहे. ‘साहो’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सुरजीत यांनी केलं आहे. हा चित्रपट येत्या 15 ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI