समृद्धी महामार्गासाठी उभ्या पिकावर बुलडोझर फिरवला

शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला (samruddhi highway construction) जमीन देण्यास नकार दिला. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पोलीस बंदोबस्त लावून उभ्या पिकात बुलडोझर फिरविला. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अधिकाऱ्याला शेतीसोबत कपडे काढून देत निषेध व्यक्त केला.

समृद्धी महामार्गासाठी उभ्या पिकावर बुलडोझर फिरवला
| Edited By: | Updated on: Aug 07, 2019 | 6:38 PM

वाशिम : राज्य सरकारचा महत्वाकांक्षी असलेल्या समृद्धी महामार्गाचे काम (samruddhi highway construction) सुरू झालंय. मात्र वाशिम जिल्ह्यातील 40 शेतकऱ्यांना ओलितांची जमीन असून कोरडवाहू शेतीचा मोबदला देत असल्याने, शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला (samruddhi highway construction) जमीन देण्यास नकार दिला. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पोलीस बंदोबस्त लावून उभ्या पिकात बुलडोझर फिरविला. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अधिकाऱ्याला शेतीसोबत कपडे काढून देत निषेध व्यक्त केला.

वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गासाठी एकूण 52 गावातील दोन हजार हेक्टर पेक्षा अधिक जमीन जात आहे. यापैकी बहुतांश शेतीचे भूसंपादन झालं आहे. मात्र मालेगाव तालुक्यातील वारंगी, रिधोरा, सुकांडा अनसिंग, सुदी येथील 40  शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात जमीन संपादीत करून शेतातील उभे पीक नष्ट केलं.

वारंगी येथील शेतकरी विजय दहात्रे यांची 13 एकर जमीन समृद्धी महामार्गात जात आहे. त्यांची ओलिताची जमीन असून त्यांना कोरडवाहू शेतीचा मोबदला देत असल्याने त्यांनी जमीन देण्यास नकार देत जमीन पेरणी केली. मात्र बुलडोझर फिरविल्यामुळे उभं पीक नष्ट झालंय. सरकारने आम्हाला पिकासहित मोबदला द्यावा अशी मागणी शेतकरी करत आहेत.

सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गामुळे विदर्भातील नागरिकांना चांगला फायदा होणार आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांची जमीन जात आहे, त्यांना किमान मोबदला तरी मिळावा अशी मागणी पीडित शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.