माजी नगराध्यक्षांच्या पतीची महाबळेश्वरातील वेण्णा लेकमध्ये उडी

महाबळेश्वर ट्रेकर्सच्या मदतीने दीपक कांदळकर यांचा तलावात शोध घेतला जात आहे.

माजी नगराध्यक्षांच्या पतीची महाबळेश्वरातील वेण्णा लेकमध्ये उडी
| Updated on: Oct 06, 2020 | 6:50 PM

सातारा : सातारा नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा ज्योती कांदळकर यांच्या पतीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. महाबळेश्वर येथील वेण्णा लेकमध्ये उडी घेऊन दीपक कांदळकर यांनी जीवनयात्रा संपवली. (Satara Ex Nagaradhyaksha Jyoti Kandalkar Husband Suicide)

महाबळेश्वर ट्रेकर्सच्या मदतीने दीपक कांदळकर यांचा तलावात शोध घेतला जात आहे. महाबळेश्वर ट्रेकर्ससह पोलादपूर, महाड येथील जलतरणपटूही शोधकार्यात सहभागी झाले आहेत.

दीपक कांदळकर यांनी वेण्णा लेकच्या बाहेर आपले जॅकेट आणि चप्पल काढून ठेवली त्यानंतर तलावात उडी मारली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. दीपक कांदळकर यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. महाबळेश्वर पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

महाबळेश्वरमधील वेण्णा लेक परिसरात पर्यटकांची गजबज असते. मात्र लॉकडाऊनच्या काळात पर्यटकांची संख्या कमी झाल्याने या परिसरात सध्या कमी गर्दी असते.