सांगलीत शिवसेना पदाधिकाऱ्याची गुंडगिरी, भरचौकात तलवारीने केक कापला

सांगलीत शिवसेना पदाधिकाऱ्याची गुंडगिरी, भरचौकात तलवारीने केक कापला

सांगली : तलवारीने केक कापून स्टंटबाजी करणं सांगलीतील एका शिवसेना पदाधिकाऱ्याला चांगलंच महागात पडलंय. 20 जानेवारीला सांगलीचे शिवसेना उपशहरप्रमुख संभाजी उर्फ शंभूराज काटकर याचा वाढदिवस होता. त्यावेळी काटकरने वाढदिवस साजरा करताना रात्रीच्या वेळी हातामध्ये तलवार घेऊन केक सांगलीत कापला. वाढदिवसाच्या दिवशी तलवारीने केक कापल्या प्रकरणी शंभूराज काटकरला अटक करण्यात आली आहे.

शंभूराज काटकर विरोधात आर्म अक्टनुसार सांगली जिल्ह्यातील संजय नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलय. पोलिसांनी त्यांच्याकडून तलवार जप्त केली आहे. पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने ही कारवाई केली. चौकाचौकात तलवारीने केक कापण्याचे प्रकार वाढत असल्याने पोलिसांनी त्यावर कारवाई सुरू केली आहे.

पोलिसांच्या या धडक कारवाईच्या मोहिमेमुळे गुंडगिरी करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आळा बसला आहे. संभाजी उर्फ शंभूराज काटकर हा सध्या सांगलीचा शिवसेना उपशहरप्रमुख या पदावर आहे. तो शिवसेना युवा सेनेचा माजी जिल्हा प्रमुख होता.

शंभूराज काटकर शिवसेनेचे माजी जिल्हा अध्यक्ष दिवंगत आप्पासाहेब काटकर यांचा द्वितीय चिरंजीव आहे. आप्पासाहेब काटकार हे कट्टर शिवसैनिक होते. बेळगाव (महाराष्ट्र) सीमा भागातील लढवय्ये नेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांना माननारा मोठा वर्ग आहे. मात्र त्यांच्याच मुलाने असे कृत्य केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI