चरसी नौटंकी कंगना को “Y ” सुरक्षा, गरीब की बेटी आग के हवाले, शिवसेनेचा मुंबईत मोर्चा

शिवसेनेने शिवाजी पार्क ते दादर असा निषेध मोर्चा काढत उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. ((Shivsena's protest in Mumbai demanding justice for rape victim of Hathras)०

चरसी नौटंकी कंगना को "Y " सुरक्षा, गरीब की बेटी आग के हवाले, शिवसेनेचा मुंबईत मोर्चा

मुंबई : हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. देशभरातून उत्तर प्रदेश सरकारविरोधात मोर्चे आणि  घोषणाबाजी होतना दिसत आहे. शिवसेनेनेही (Shivsena)  शिवाजी पार्क ते दादर असा निषेध मोर्चा काढत पीडितेला न्याय देण्याची मागणी केली. शिवसेनेने ‘चरसी नौटंकी कंगना को “Y ” सुरक्षा, गरीब की बेटी आग के हवाले’ अशा घोषणा देत उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारला लक्ष्य केले. तसेच उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांचे गुंडाराज सुरु असून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणीही शिवेसेनेने केली. (Shivsena’s protest in Mumbai demanding justice for rape victim of Hathras)

मिनाताई ठाकरे स्मृतीस्थळ ते दादरपर्यंत मोर्चा, कार्यंकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

मोर्चात सुरुवातीला शिवाजी पार्कमधील मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मोर्चा दादरमधील चैत्यभूमीकडे वळवण्यात आला. यावेळी शिवसेना कार्यकर्ते तसेच मुंबईकरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मोर्चेकऱ्यांच्या हातात काळे झेंडे तसेच येगी आदित्यनाथ सरकारवर टीका करणारी फलकं झळकत होती. यावेळी शिवसैनिकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘योगी सरकार हाय हाय, मोदी सरकार हाय हाय, युपी मे दु:ख गरीब बस्तीमे पोलीस दरिंदे मस्तीमे,’ अशा घोषणाबाजींनी दादर परिसर दुमदुमला होता.

यावेळी बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांना वेळीच न्याय मिळावा अशी मागणी शिवसेनेने केली. तसेच कुटुंबियांच्या इच्छेविरुद्ध पीडितेचे अंत्यसंस्कार करण्यात आले असून, हे अमानवीय असल्याचा आरोपही शिवसेनेकडून करण्यात आला. उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांचे गुंडाराज सुरु असून लोकशाहीची धुळधान झाली आहे, असा दावाही शिवसेनेने यावेळी केला.

दरम्यान, हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावरुन काँग्रेस पक्षही आक्रमक झाला आहे. पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) हे हाथरसकडे रवाना झाले आहेत. हे दोघेही पीडित कुटुंबाची भेट घेणार आहेत. राहुल आणि प्रियांका गांधी दोन दिवसांपूर्वी हाथरस प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी निघाले होते. परंतु दोघांनाही ग्रेटर नोएडा येथील परी चौकात रोखून पुन्हा दिल्लीला पाठवले. तिथे राहुल गांधी यांच्यासोबत धक्काबुक्की देखील झाली होती. यापार्श्वभूमीवर राहुल आणि प्रियांका गांधी हे हाथरसला जायला निघाले असून हाथरसकडे जाणाऱ्या रस्त्यावर अभूतपूर्व बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

संबंधित बातम्या : LIVE | राहुल आणि प्रियांका गांधी हाथरसकडे रवाना; नाक्यानाक्यावर पोलिसांचा बंदोबस्त

Anushka Sharma| पालकांनो, मुलांना स्त्रियांचा सन्मान करायला शिकवा, अनुष्का शर्माची संतप्त प्रतिक्रिया!

उत्तर प्रदेश पुन्हा बलात्काराने हादरलं, मेरठमध्ये आठ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

(Shivsena’s protest in Mumbai demanding justice for rape victim of Hathras)

Published On - 5:27 pm, Sat, 3 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI