हरियाणामध्ये धक्कादायक प्रकार, सिलेंडरसोबत सापाची डिलिव्हरी

हरियाणाच्या फतेहाबादमध्ये एका व्यक्तीच्या घरी सिलेंडरच्या खाली साप आढळून आला (Snake Found with gas cylinder delivery).

हरियाणामध्ये धक्कादायक प्रकार, सिलेंडरसोबत सापाची डिलिव्हरी
Follow us
| Updated on: Aug 28, 2020 | 3:17 PM

चंदीगड : हरियाणातील फतेहाबादमध्ये एका व्यक्तीच्या घरी सिलेंडर खाली साप आढळून आला (Snake Found with gas cylinder delivery). या धक्कादायक घटनेमुळे घरातील सदस्यांमध्ये एकच खळबळ उडाली. सिलेंडरच्या खालच्या भागात हा साप बसला होता. त्यानंतर एका सर्पमित्राला बोलावून सापाला पकडण्यात आले.

फतेहाबादमधील घटनेमुळे गावातील इतर लोकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले. सिलेंडर डिलिव्हरी करताना सापही त्यासोबत घरात आला. सिलेंडर घरी डिलिव्हर झाल्यानंतर तो पलटी केला असता सिलेंडरच्या खाली साप असल्याने दिसले. यामुळे सर्वत्र घरात एकच खळबळ उडाली.

साप आढळल्यामुळे तातडीने सर्पमित्र डॉ. गोपी यांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर डॉ. गोपी घटनास्थळी पोहोचताच त्यांनी सिलेंडरमधून सापाला बाहेर काढले आणि जंगलात सोडून दिले.

“पावसामध्ये बऱ्याचदा अशा घटना समोर येतात. पाऊस असल्यामुळे साप सिलेंडर, गॅस आणि घरात येऊन बसतात. त्यामुळे घरी सिलेंडर किंवा इतर कोणत्याही वस्तूंची डिलिव्हरी घेताना पूर्ण तपासणी करुन घ्यावी. जेणेकरुन तुमच्या जीवाला धोका निर्माण होणार नाही”, असं सर्पमित्र डॉ. गोपी यांनी सांगितले.

दरम्यान, याआधीही बऱ्याचदा अशा घटना देशातील अनेक भागात घडल्या आहेत. महाराष्ट्रातील वाशिममध्येही सिलेंडरच्या खालच्या भागात साप आढळून आला होता. त्यावेळी सर्पमित्रांनी या सापाला बाहेर काढून त्याला जंगलात सोडले होते. त्यामुळे सिलेंडर घेताना त्याची व्यवस्थित तपासणी करणे गरजेचे आहे.

संबंधित बातम्या :

नाग अंगावर सोडून पत्नीची थंड डोक्याने हत्या, वीस दिवसांनी गूढ उकललं

नवी मुंबईत साप चावल्याने दोन वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू

Non Stop LIVE Update
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.