नाग अंगावर सोडून पत्नीची थंड डोक्याने हत्या, वीस दिवसांनी गूढ उकललं

सूरजने पत्नी झोपलेली असताना तिच्या अंगावर साप फेकला. बेडवर बसून त्याने साप उत्तराला दोन वेळा चावल्याची खातरजमा केली. (Kerala Man getting his wife killed by a snakebite)

नाग अंगावर सोडून पत्नीची थंड डोक्याने हत्या, वीस दिवसांनी गूढ उकललं

तिरुअनंतपुरम : खोलीत नाग सोडून पत्नीचा जीव घेतल्याप्रकरणी केरळमध्ये आरोपी पतीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सुनियोजित कट आखून त्याने पत्नीची थंड डोक्याने हत्या केल्याचं समोर आलं आहे. हत्येच्या वीस दिवसांनी या प्रकरणाचं गूढ उकललं. (Kerala Man getting his wife killed by a snakebite)

27 वर्षीय आरोपी सुरज एका खासगी बँकेत नोकरी करतो. सूरजने आपली पत्नी उत्तराला जीवे मारण्यासाठी नाग विकत घेतला होता. नाग अंगावर सोडून एखाद्याचा जीव कसा घेता येईल, यासाठी त्याने इंटरनेटवर व्हिडिओही पहिले होते.

पत्नीचे पैसे आणि सोने घेऊन दुसर्‍या तरुणीशी लग्न करण्याची त्याची योजना होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. पत्नीच्या निधनानंतर काही दिवसातच त्याने तिच्या मालमत्तेवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिच्या पालकांनी पोलिसांना फोन केला. सुरज आणि उत्तरा यांना एक वर्षाचा मुलगा आहे.

हेही वाचा : तीन महिन्यांच्या बाळाच्या हत्येची तक्रार, आईच निघाली खुनी

सात मे रोजी उत्तरा कोल्लममधील तिच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळली होती. तिला साप चावल्याचं समजल्यावर तिच्या कुटुंबाचा संशय बळावला. कारण फेब्रुवारी महिन्यातही तिला साप चावला होता.

पोलिसांनी या प्रकरणात अधिक तपास सुरु केला, तेव्हा सूरजने फेब्रुवारीतही हत्येचा प्रयत्न केल्याचं समोर आलं. त्याने सुरेश नावाच्या मित्राच्या मदतीने अत्यंत विषारी साप विकत घेतला. मात्र त्याने आखलेली योजना तेव्हा फसली होती. साप चावल्याने उत्तरा महिनाभर रुग्णालयात होती.

6 मे रोजी सूरजने पत्नी झोपलेली असताना तिच्या अंगावर साप फेकला. बेडवर बसून त्याने साप उत्तराला दोन वेळा चावल्याची खातरजमा केली. दुसर्‍या दिवशी सकाळी तिला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र सर्पदंशानंतर तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

सूरजने साप पुन्हा पकडण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो निसटला. रात्रभर तो झोपला नाही. नंतर तो साप घरात जिवंत सापडला होता.

(Kerala Man getting his wife killed by a snakebite)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *