मराठा आरक्षणाला इतर समाजाच्या नेत्यांचाही पाठिंबा, शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी: सुरेशदादा पाटील

| Updated on: Oct 28, 2020 | 6:18 PM

साताऱ्यात 2 नोव्हेंबरला होणाऱ्या गोलमेज परिषदेपूर्वी शरद पवार यांनी मराठा आरक्षणावरील भूमिका स्पष्ट करावी, अशी विनंती मराठा आरक्षण संघर्ष समितीचे नेते सुरेशदादा पाटील यांनी केली आहे. (Sureshdada Patil appeals to Sharad Pawar should clear stand on Maratha Reservation)

मराठा आरक्षणाला इतर समाजाच्या नेत्यांचाही पाठिंबा, शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी: सुरेशदादा पाटील
Follow us on

सातारा : मराठा आरक्षण संघर्ष समिती आणि मराठा आरक्षण समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 2 नोव्हेंबरला सातारा येथे पश्चिम महाराष्ट्रातील विभागीय गोलमेज परिषदेचे आयोजन केले असल्याची माहिती मराठा आरक्षण संघर्ष समितीचे सुरेशदादा पाटील यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यापूर्वी मराठा आरक्षण मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी विनंती पाटील यांनी केली आहे. (Sureshdada Patil appeals to Sharad Pawar should clear stand on Maratha Reservation)

मराठा समाजाला आरक्षण कधी मिळेल हे सांगता येत नाही. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. ओबीसी समाजाच्या नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. शरद पवार यांच्याकडे जाणता राजा म्हणून बघितले जाते. राज्याच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा आहे. शरद पवार यांनी लवकरात लवकर मराठा आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट करावी, अशी विनंती करत आहोत. त्यामुळे मराठा समाजाला शरद पवार आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याच्या आंदोलनात सहभागी आहेत, हे समजेल असं सुरेशदादा पाटील म्हणाले.

शरद पवार यांनी मराठा आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट करावी, यांनंतर आम्हाला 2 नोव्हेंबरला होणाऱ्या गोलमेज परिषदेत आंदोलनाची दिशा ठरवता येईल, असं पाटील म्हणाले.

सुरेशदादा पाटील यांनी मराठा आरक्षणाचा विषय सुप्रीम कोर्टात आहे. 102 वी घटनादुरुस्ती, केंद्रीय मागासवर्ग आयोग, 103 वी घटनादुरुस्ती, आर्थिक मागास प्रवर्ग (EWS) अशा इतर गुंतागुंतीच्या विषयांमुळे मराठा आरक्षणाचा विषय लवकर सुटण्याची शक्यता कमी आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न जेवढा लांबवता येईल तेवढा लांबवण्याचा प्रयत्न राज्य आणि केंद्र सरकारकडून केला जातोय.

मराठा समाजासाठी EWS  चा निर्णय देखील सरकार घेत नाही. मराठा आरक्षणाच्या गंभीर विषयावर राज्यातील नेत्यांनी लक्ष घालावे. यासाठी राज्यातील विविध विभागांमध्ये गोलमेज परिषदांमध्ये घेणार आहोत. गोलमेज परिषदांद्वारे संघटित ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. विविध विभागातील गोलमेज परिषदांद्वारे मराठा समाजाला संघटित करण्याचा प्रयत्न करणार आहे. साताऱ्यातील गोलमेज परिषदेनंतर इतर विभागात परिषदा होतील त्यानंतर आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल, असं सुरेशदादा पाटील म्हणाले.

मराठा समाजाकडून मुंबईत आंदोलन

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या सुनावणी चार आठवडे तहकूब करण्यात आली. यानंतर राज्य सरकारच्या भूमिकेवर मराठा समाजामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. मुंबईत चेंबूर आणि बोरिवली येथे मराठा समाजाने आंदोलन केले. यावेळी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याविरोधात घोषणाबाजी आणि राजीनाम्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने चेंबूर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात येत असून सरकारचा निषेध व्यक्त केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाची सुनावणी आता चार आठवडे पुढे गेली आहे. सरकार योग्य बाजू मांडत नाही म्हणून ही वेळ आली आहे, असा आरोप मराठा आंदोलकांनी केला आहे, सरकारचा निषेध करण्यासाठी आज अनेक ठिकाणी मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात आले.

संबंधित बातम्या:

…तर खंबीर मराठा समाज ठाकरे सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही : उदयनराजे भोसले

Maratha Reservation | मराठा संघटनांचे मुंबईत आंदोलन, अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी

(Sureshdada Patil appeals to Sharad Pawar should clear stand on Maratha Reservation)