ब्राझीलच्या जेलमध्ये हत्याकांड, 57 जणांचा मृत्यू, 16 जणांचे शीर कापले

| Updated on: Jul 30, 2019 | 1:12 PM

ब्राझिलच्या पारा राज्यातील तुरुंगात आरोपींच्या (Accused) दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. या हाणामारीत तब्बल 57 आरोपींचा मृत्यू झाला आहे. तर यातील 16 जणांचे शीर धडापासून वेगळं केले आहे.

ब्राझीलच्या जेलमध्ये हत्याकांड, 57 जणांचा मृत्यू, 16 जणांचे शीर कापले
Follow us on

ब्रासिलया (ब्राझील) :  ब्राझीलच्या पारा राज्यातील तुरुंगात आरोपींच्या (Accused) दोन गटात तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत तब्बल 57 आरोपींचा मृत्यू झाला आहे. तर यातील 16 जणांचे शीर धडापासून वेगळं केले आहे. हा धक्कादायक प्रकार ब्राझीलच्या अल्टमीरा तुरुंगात घडला आहे. ब्राझीलच्या जेलमध्ये क्षमतेपेक्षा अधिक आरोपी (Accused) आहेत. त्यामुळे सरकारलाही त्यांच्यावर नियंत्रण ठेवता येत नाही.

अल्टामीरा तुरुंगात सकाळी 7 वाजता दोन गट एकमेकांना भिडले. एका गटाने दुसऱ्या गटाच्या सेलला आग लावली. या आगीत अनेक कैद्यांचा मृत्यू झाला, असं जेलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

तुरुंगात एक गट नाश्ता करण्यासाठी बसला होता. त्यावेळी दुसऱ्या गटाच्या आरोपींनी येऊन थेट मारहणा करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत तुरुंगाचे कर्मचारीही जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हल्ला का आणि कशामुळे झाला याबद्दल अजून माहिती मिळालेली नाही. पण व्हिडीओमध्ये दिसत आहेत की, सर्व आरोपी हाणामारी झाल्यानंतर मजा मस्ती करत आहेत. तसेच ते लादीवर पडलेल्या शीरांना लाथ मारत आहेत. अजूनपर्यंत अधिकाऱ्यांनी यावर स्पष्टीकरण दिलेलं नाही.

अल्टामीरा तुरुंगात झालेल्या धक्कादायक प्रकारामुळे एका गटाला दुसऱ्या तुरुंगात स्थलांतरित करा. ज्यामुळे वाद होणार नाहीत, अशी मागणी काही आरोपींच्या नातेवाईकांनी केली आहे.

यापूर्वीही मे 2017 मध्ये अमेझोन राज्याच्या तुरुंगात असाच हल्ला दोन्ही गटात झाला होता. ज्यामध्ये जवळपास 55 आरोपींचा मृत्यू झाला होता. अनेक आठवडे ही हिंसा तुरुंगात सुरु होती. ज्यामुळे तुरुंगात 150 आरोपींचा मृत्यू झाला होता.

ब्राझीलच्या तुरुंगात जवळपास साडे सात लाख आरोपी आहेत. संपूर्ण जगात ब्राझील तिसरा देश आहे जिथे सर्वाधिक आरोपी तुरुंगात आहेत.