AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टायगर श्रॉफ प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! थेट ड्रायव्हरने…. गोळीबाराचं कोडं उलगडणार

tiger shroff case : टायगर श्रॉफ प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी कारवाईसाठी मोठं पाऊल टाकलं आहे. पोलिसांनी काय कारवाई केली,जाणून घ्या.

टायगर श्रॉफ प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! थेट ड्रायव्हरने.... गोळीबाराचं कोडं उलगडणार
tiger shroffImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 19, 2026 | 7:56 AM
Share

प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफवर रविवारी सायंकाळी गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारातून टायगर थोडक्यात बचावला आहे. परंतु गोळीबारात जखमी झालेल्या टायगरला नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर तिघांनी गोळीबार केल्याचे सांगण्यात आलं आहे. हल्ल्याची जबाबादारी बिश्नोई गँगने घेतली आहे. रुग्णालयातून घरी परतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी टायगरची घरी जाऊन विचारपूस केली. या गोळीबारामुळे संपूर्ण बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.

टायगर श्रॉफवर गोळीबार झाल्यानंतर सिनेकलाकार घाबरून गेले आहेत. गोळीबारानंतर पोलीस देखील अॅक्शनमोडमध्ये आहेत. टायगर श्रॉफच्या ड्रायव्हरच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यास सुरुवात केली आहे. जुहू पोलिसांकडून टायगर श्रॉफ याच्या ड्रायव्हरकडून जबाब घ्यायला सुरुवात केली आहे.  हत्येचा प्रयत्न, गुन्ह्याचा कट रचणे, शस्त्र कायदा अशा भारतीय न्याय संहितेच्या कलमअंतर्गत गुन्हा नोंदवायला सुरुवात केली आहे. घटनास्थळावरील 2 साक्षीदारांचाही जबाब पोलीस नोंदवत आहेत. या गोळीबारात उमेश चव्हाण नावाचा व्यक्ती जखमी झाली आहे. त्याच्या छातीवर गोळी लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

टायगर श्रॉफ याच्या घरा खाली पोलीस बंदोबस्त वाढवला

सलमान खानसोबत काम करत असल्याने गोळीबार केल्याचा दावा बिश्नोई टोळीने केला आहे. टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर मुंबई पोलीस अलर्ट झालं आहे. टायगर श्रॉफवर हल्ल्या झाल्यानंतर तातडीने एकनाथ शिंदे हे भेटण्यासाठी गेले. टायगर हा सध्या कार्टर रोडच्या घरी आहे. टायगरच्या घराखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

चालकावर गोळीबार झाल्यानंतर टायगरने काय केलं?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी पहिल्यांदा गोळीबार केला. त्या गोळीबारात टायगरचा ड्रायव्हर जखमी झाला. त्यानंतर पुढील क्षणात टायगरने ड्रायव्हरला दुसऱ्या सीटवर शिप्ट केलं. त्यानंतर स्वत: गाडी चालवण्यास घेतली. त्यानंतरही पुन्हा गोळीबार झाला. त्याच्यावर तब्बल 10 गोळ्या झाडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत पोलिसांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही.  पोलिसांकडून जलदगतीने कारवाईला सुरुवात केली आहे.

Follow Us
टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या दुसऱ्याच दिवशी सरकारचा मोठा निर्णय...
टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या दुसऱ्याच दिवशी सरकारचा सर्वात मोठा निर्णय, जुहू परिसरातील सर्व...
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, एकनाथ शिंदेंनी घेतली अभिनेत्याची भेट;
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, एकनाथ शिंदेंनी घेतली अभिनेत्याची भेट; म्हणाले, गुन्हेगारांना...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेचा तपास...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेच्या तपासाला वेगळेच वळण
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्या, बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर
टायगर श्रॉफच्या गाडीवर धाडधाड गोळ्या झाडल्या, पण कारण काय? बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर!
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? भारताच्या सर्वोच्च न्यायालयात...
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? सर्वोच्च न्यायालयात... नेमका निर्णय काय?
भिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून..
Tiger shroff Video : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा पहिला थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून आलेले तिघं...
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
Latest Update : अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा,
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा, इतर योजनांमधील निधी...
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार,
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार, म्हणाले एक्सपायरी डेट जवळ आली
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण