सहा वर्षीय चिमुकलीला चिरडल्याचा राग अनावर, जमावाच्या मारहाणीत ट्रक वाहकाचा मृत्यू

सांगली : भरधाव ट्रकने एका सहा वर्षीय चिमुकलीला चिरडल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीत घडला. त्यानंतर संतप्त जमावाने ट्रक वाहकाला बेदम मारहाण केली, या मारहाणीत ट्रक वाहकाचा मृत्यू झाला आहे. सांगलीच्या हरिपूर रस्त्यावर लिंगायत स्मशानभूमीजवळ ही घटना घडली. यामध्ये ऋचा सुशांत झेंडे या सहा वर्षीय मुलीचा तर ट्रक वाहक कुमार आडगेकर (वय 45) यांचा मृत्यू झाला आहे. […]

सहा वर्षीय चिमुकलीला चिरडल्याचा राग अनावर, जमावाच्या मारहाणीत ट्रक वाहकाचा मृत्यू
Follow us
| Updated on: Jun 02, 2019 | 9:15 AM

सांगली : भरधाव ट्रकने एका सहा वर्षीय चिमुकलीला चिरडल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीत घडला. त्यानंतर संतप्त जमावाने ट्रक वाहकाला बेदम मारहाण केली, या मारहाणीत ट्रक वाहकाचा मृत्यू झाला आहे. सांगलीच्या हरिपूर रस्त्यावर लिंगायत स्मशानभूमीजवळ ही घटना घडली. यामध्ये ऋचा सुशांत झेंडे या सहा वर्षीय मुलीचा तर ट्रक वाहक कुमार आडगेकर (वय 45) यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. सांगली शहर पोलिसांत या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हरिपूर रस्ता काळीवाट येथे ऋचा ही तिच्या कुटुंबीयांसोबत राहायची. रात्रीच्या सुमारास ती काका संदीप झेंडे यांच्याबरोबर गाडीवरुन घरी जात होती. काळीवाट चौकात गाडी वळण घेत असताना एक भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. यामध्ये ऋचा गंभीर झाली. चालकाला वेगावर नियंत्रण मिळवता आले नाही. त्यानंतर ट्रक समोर जाऊन थांबला. त्यानंतर चालकाने तेथून पळ काढला. मात्र, वाहक हा पळू शकला नाही. संतप्त जमावाने वाहकाला ट्रकमधून बाहेर ओढलं, त्याला मारहाण केली. तर काहींनी जखमी ऋचाला रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. ऋचाचा मृत्यू झाल्याचं समजताच जमावाने वाहकाला आणखी मारहाण केली, यानंतर चालक बेशुद्ध पडला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जमावाला बाजूला करत जखमी वाहकाला सांगलीच्या सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. परंतु, त्याचाही मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.