AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुला कापूनच टाकतो, वारकरी संप्रदायाच्या महाराजांकडून तृप्ती देसाईंना धमकी

भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांना वारकरी संप्रदायाच्या सोमनाथ महाराज भोर यांनी फोनवरुन धमकी दिली (Trupti Desai Threaten call)  आहे.

तुला कापूनच टाकतो, वारकरी संप्रदायाच्या महाराजांकडून तृप्ती देसाईंना धमकी
| Edited By: | Updated on: Feb 23, 2020 | 7:29 AM
Share

पुणे : भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांना वारकरी संप्रदायाच्या सोमनाथ महाराज भोर यांनी फोनवरुन धमकी दिली (Trupti Desai Threaten call)  आहे. “जर इंदोरीकर महाराजांच्या विरोधातील तक्रार मागे घेतली नाही, तर तुला कापूनच टाकतो,” अशी धमकी सोमनाथ महाराज भोर यांनी दिली आहे.

“किर्तनातून महिलाचा वारंवार अपमान करणारे निवृत्ती देशमुख उर्फ इंदोरीकर यांच्यावर मी गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यानंतर अनेक धमक्यांचे फोन येत आहे. पण काल (21 फेब्रुवारी) मी सकाळी राहत्या घरी धनकवडी पुणे येथे असताना मला एक फोन आला.

त्यावर समोरुन “मी सोमनाथ महाराज भोर, अकोले तालुक्यातून बोलत आहे, असे सांगण्यात आले. तुम्ही तृप्ती देसाई बोलताय का असा प्रश्न विचारल्यानंतर मी हो म्हणून उत्तर दिले. त्यानंतर समोरुन अश्लील शिवीगाळ सुरू केला. शिवीगाळ सुरु केल्यामुळे मी कॉल रेकॉर्डिंग सुरू (Trupti Desai Threaten call) केले.

त्यात तू जर इंदोरीकर महाराजांच्या विरोधातील तक्रार मागे घेतली नाहीस तर तू अकोलेत ये, तुला कापूनच टाकतो अशी धमकी देण्यात आली. त्याशिवाय त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळही केली,” असा आरोप तृप्ती देसाई यांनी केला आहे.

मला कापून टाकण्याची भाषा हे महाराज करीत आहे. त्यामुळे माझ्यासह कुटुंबियांच्या जीवाला पुन्हा एकदा इंदोरीकर समर्थकांकडून धोका निर्माण झाला आहे, असेही तृप्ती देसाईंना सांगितले आहे. याबाबत त्यांनी पुण्यातील सहकारनगर पोलिस स्टेशन येथे मेलद्वारे तक्रार दाखल केली (Trupti Desai Threaten call) आहे.

Follow Us
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात.
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!.
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.